ब्रेकिंग न्यूज
⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल…
SP News Maregaon

हिवरा ते मुकटा रस्ता मोजतोय अखेची घटका.

142 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

रस्त्याच्या अर्धवट कामामुळे नागरिक भोगताहेत नरकयातना.

हिवरा मजरा ते मुकटा रस्त्याची दैनावस्था.

विदर्भ एस. पि. न्युज नेटवर्क मारेगांव,

मारेगांव तालुक्यातील हिवरा ते मुकटा रस्त्याच्या अर्धवट कामामुळे नागरिकांना नरकयातना भोगायला लागत असल्याची परिस्थिती हिवरा ते मुकटा या रस्त्याची आहे. गेल्या वर्षांपासून सुरु झालेले काम अजूनही अपूर्णांवस्थेत असल्याने यावर्षीही पावसाळ्यात या गावातील नागरिकांसह विद्यार्थ्यांना मोठया त्रासाला सामोरे जाण्याची वेळ पुन्हा येऊन ठेपल्याचे दिसत आहे.

वर्धा नदीच्या काठावरील आणि राजकीय व सामाजिक दृष्टया उपेक्षित असलेले तालुक्यातील हिवरा ते मुकटा या सुमारे तिन किलोमीटर रस्त्याचे काम मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत मंजूर झालेले आहे.असुन रू 175.53 लक्ष प्रस्तावीत कामाची रक्कम आहे.तर 5 वर्ष देखभाल व दुरुस्ती करण्याची किमत रू 16.91 लक्ष आहे.रस्त्यावर चार ते पाच पूल मंजूर असून त्यापैकी दोन पुलांचे काम पूर्ण असून उर्वरित पूल अजूनही स्लॅबच्या प्रतीक्षेत आहे.

रस्त्यावर काही ठिकाणी गिट्टी टाकलेली आहे.काही ठिकाणी बरोबर दबाई केलेली नसल्याने नागरिकांना वाहन चालवतांना मोठी कसरत करावी लागते.जागोजागी गिट्टी उखरलेली आहे. व चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे.त्या मुळे हा रस्ता अखेरची घटका मोजत आहे.या कामाला सुरवात होऊन एक वर्षाचा कालावधी लोटला तरी कामाच्या प्रगतीवरून यावर्षी पावसाळ्यात काम पूर्ण होईल याची गॅरंटी कमीच आहे.

या गावातील नागरिकांना काही कामानिमित्त तहसील कार्यालय किंवा तालुक्याच्या इतर कामाला जायचे असल्यास त्यांना वरोरा वणी मार्गे मारेगावला यावे लागते.रस्त्याच्या अर्धवट कामामुळे आणि रस्त्यावर असलेल्या माती मिश्रित मुरुमामुळे पावसाळ्यात रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे.त्यामुळे इतर सोयीसुविधा येथील नागरिकांना मिळत नाहीच उलट येथील शाळकरी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसानही होत असते.त्यामुळे त्वरित या रस्त्याचे काम करण्यात यावे अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर