ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

संबंध एकीसोबत लग्न दुसरीसोबत

111 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

आरोपी प्रियकराविरुद्ध मारेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

सुरेश पाचभाई मारेगाव,

प्रेमाच्या आणाभाका एकीसोबत आणि लग्न दुसरीसोबत लावणाऱ्या प्रियकराविरोधात अखेर फसवणूक झालेल्या प्रेयसीने पोलिसात तक्रार दाखल केली.सदर घटना मारेगाव तालुक्यातील एका गावातील असून या घटनेने प्रेयसीला मोठा धक्का बसला आहे.

तालुक्यातील एका गावातील एका अल्पवयीन मुलीचे तालुक्यातीलच सगणापूर येथील गणेश सुरेश आत्राम वय 23 वर्ष या युवकाशी सूत जुळले.सन 2019 जुळलेले यांचे प्रेम दिवसेंदिवस बहरत गेले.भेटी गाठी वाढल्या.अशातच दि.8/11/2022 ला आरोपीने या अल्पवयीन मुलीला घरी बोलावून 16/11/2022 ला घराचा वास्तू आहे. त्यादिवशीच आपण दोघे लग्न लावू असे सांगून सतत आठ दिवस लैंगिक अत्याचार केला.त्यानंतरही लग्नाचे आमिष देऊन वारंवार लैंगिक शोषण करीत होता.

आणि याची कोठेही वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी देत होता.अशातच गावातील ग्रामसेवक आणि आशा वर्कर यांनी 18 वर्षे पूर्ण झाल्याशिवाय तुम्हाला लग्न लावता येत नाही असे सांगितले. तसेच 18 वर्षे पूर्ण झाल्यावर याच मुलीशी लग्न करेल असे मुलाकडून कबूलही करून घेतले होते.

मुलगी बाहेर गावाला राहत असल्याचा फायदा घेऊन आरोपी प्रियकराने 1/5/2024 ला दुसऱ्या मुलीशी लग्न केले.या घटनेची माहिती मिळताच मुलीला धक्काच बसला.सन 2019 पासून जपलेले प्रेम एकाएकी तुटून पडले.घेतलेल्या आणाभाका हवेतच विरून गेल्या होत्या.आता काय करावे या विमनस्क अवस्थेत असलेल्या प्रेयसीने अखेर प्रियकराविरुद्ध आपल्या वडिलांसोबत मारेगाव पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली.

यावरून मारेगाव पोलिसांनी आरोपी प्रियकराविरुद्ध कलम 376(2)(n),506, बाल लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कलम 3(अ )4,5(आय )6 नुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास ठाणेदार शंकर पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली मारेगाव पोलीस करीत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर