ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार प्रदान.

72 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

कोविड काळात उत्कृष्ट कामगिरीसाठी अडेगाव येथिल महिलाचा सन्मान.

तालुका प्रतिनीधी :-झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी
[88059 79173]

झरी जामणी महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाच्या वतीने ग्रामपंचायत स्तरावर सामाजिक कार्य करणाऱ्या यामध्ये आशा सेविका,आरोग्य सेविका,सामाजिक कार्य,बचत गट,महिला सशक्तीकरण यामध्ये कुठल्याही प्रकारची कार्य करणाऱ्या महिलांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार द्यायचा शासनाने ठरविले.

त्यामुळे प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर याची अमलबजावणी केली यात अडेगाव ग्रामपंचायत स्तरावर कोरोना काळात आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची कामे केली त्यात मास्क गावाला उपलब्ध करून देणे,भयावह परिस्थिती असून घरोघरी जाऊन टेस्ट करणे,औषध वाटप,रुग्ण तपासणी,सनितायझर वेळोवेळी उपलब्ध करून देणे अश्या भयाण परिस्थिती महिलांना प्रसूती साठी सुरक्षित ने आण करणे,कुणाला लागण होऊ नये यासाठी नेहमी विचारपूस इत्यादी कार्य कोरोणा काळात उत्कृष्ट कार्यामुळे ग्रामपंचायतीने या पहिल्याच वर्षीचा पहिला पुरस्कार ममताबाई माहुरे व गंगाबाई काटकर यांना हा पुरस्कार देण्यात आला यांचा शाल,श्रीफळ,प्रमाणपत्र,सन्मान चिन्ह देवून सन्मानित केले.

यावेळी ग्रामपंचायत सरपंच सीमाताई लालसरे,उपसरपंच भास्कर सुर,ग्रामसेवक झोके साहेब,पोलीस पाटील अशोक उरकूडे,माजी सरपंच तथा सदस्य अरुण हिवरकर,वंदना पेटकर, संजय आत्राम,माया हिवरकार,सविता आसुटकर,गंगाबाई काटकर,शिपाई गणेश झाडे,सहायक पंकज उईके,संजय बोधे , प्रफुल बोधे,धनंजय गोंडे,उमेश शेरकी,प्रतीक उरकूडे नैतिक बोधे,ज्ञानदीप बोधे,उज्वल बोधे,तन्मय बोधे,प्रभावती बोधे, शिवानी गोंडे,अंगणवाडी सेविका देवतळे मॅडम,बल्की मॅडम, अंबटकर मॅडम,पुरस्कार महीलांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभकामना दिल्या यावेळी समस्त समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर