ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

44 हजार 500 हेक्टर शेतजमीन खरीप हंगामाकरीता सज्ज.

80 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

बि-बीयाने खते नव्या दिमतीने खरेदीची लगबग.

सुरेश पाचभाई मारेगाव,

मारेगांव मान्सूनपूर्व तयारी करून नव्या हंगामात बळीराजाने खरिपाची तयारी केली आहे.या वर्षी तालुक्यात 44 हजार 500 हेक्टर क्षेत्र तालुक्यात शेतशिवार असुन सर्ज्या राज्यासह शेतकरी खरीप पेरणी सज्ज झाला आहे.मान्सूनच्या सरी बरसताच पेरणीची लगबग सुरू होणार आहे.पावसाचे प्रमाण समाधानकारक असावी अशी शेतकरी अपेक्षा करीत आहे. अस्मानी आणि सुलतानी संकटाचा सामना करणारा हाच तो जगाचा पोशिंदा एकमेव योध्दा होय.

या वर्षी सुध्दा खरीप हंगामात कपासींचा सर्वाधिक म्हणजे 33 हजार 892 हेक्टरवर कपासीची लागवड होणार असल्याचा अंदाज कृषी अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.त्या खालोखाल सोयाबीन पिकाचा पेरा राहणार असून 5 हजार 765 हेक्टरवर सोयाबीन पिकाचा पेरा होणार आहे.तर तुर पिकाचा पेरा 4 हजार 598 हेक्टर वर होणार आहे.

यावर्षी कपासींचा पेरा जास्त राहणार असल्याने कापूस बियाणांची लगबग शेतकऱ्यांनी सुरू केली असून गेल्याकाही वर्षात सतत येणारी गुलाबी बोन्ड अळीचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मागच्या वर्षी पासुन शेतकरी कपाशीचे लवकर येणारे वाण घेण्याकडे जास्त कल दिसुन येत आहे.कापसाची वाढती मागणी बाजारात दिसुन येत आहे.

दरम्यान बळीराजाने खरिपाची तयारी केली असून मान्सूनपुर्व कामे अंतिम टप्प्यात आले असून शेतकऱ्यांना मान्सून पूर्व पावसाची प्रतीक्षा आहे.शेतकऱ्यांना बियाणे व खते कमी पडणार नाही संपूर्ण साठा तालुक्याला उपलब्ध करून देण्यात येईल अशी माहिती कृषी विभागाने दिली आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर