ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

मारेगांव तालुक्यात 132 KV अती उच्चदाब उपकेंद्र सबस्टेशनची नितांत गरज.

118 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

132 केव्ही अती उच्चदाब उपकेंद्र सबस्टेशनची गरज पण 33 केव्ही वर काम सुरू.

104 गावात फक्त 3 सबस्टेशन.

सुरेश पाचभाई मारेगांव,

मारेगांव तालुक्यात 104 गावांचा समावेश असुन तालुक्यात केवळ 3 सबस्टेशन आहे.त्या मध्ये मारेगांव 33 kv सबस्टेशन वर सुमारे 27 गावांचा समावेश आहे तर मार्डी 33 kv सबस्टेशन वर सुमारे 52 गावांचा समावेश आहे,आणी खापरी 33 kv सबस्टेशन वर सुमारे 15 गावांचा समावेश आहे.

सदर तीन ही सबस्टेशनला 33 kv सप्लाय हा राजुर व करंजी येथुन घेण्यात आला आहे.असुन मारेगाव त्यालुक्यातील सबस्टेशनला येणारा 33 KV सप्लाय हा सुमारे 15 कि.मी अंतरावरून असल्याने आणि झाडा झुडपातुन लाईंनचे पोल असल्यामुळे ऐन पावसाळ्यात वादळी वाऱ्यामुळे व पाउसामुळे लाईनच्या मध्ये मोठ्याप्रमाणात समस्या येतात मात्र कर्माचारी दिवस रात्र एक करुण सप्लाय सुरळीत करतात आणि नागरिकांचा रोष सुद्धा त्यांना सहन करावा लागत

असुन लाईनचे काम करण्यामध्ये अनेक तास निघुन जातात तर कधी कधी पुर्ण रात्र तालुक्यातील जनतेला अंधारात काडावी लागत आहे हे वास्तव्य आहे.मारेगांव तालुका हा आदिवासी बहुल तालुका आहे.तालुक्यातील सर्वात जास्त नागरीकचे वास्तव्य ग्रामीण भागात आहे.शहरा सह ग्रामीण भागातील लोकांना पावसाच्या दिवसात जाणाऱ्या लाईन मुळे कुचंबणा होत आहे.

मात्र गेल्या अनेक वर्षांपासून या समस्येकडे लोक प्रतिनिधीचे कायम दूर लक्ष आहे.तालुक्यांतील जनतेच्या नितांत गरज असलेला विद्युतचा प्रश्न कायम मिटविण्या साठी तालुक्यात 132 केव्ही अती उच्चदाब उपकेंद्र सबस्टेशनची तालुक्यात गरज आहे पण 33 केव्ही वर गेल्या अनेक वर्षापासून काम सुरू आहे.

132 केव्ही अती उच्चदाब उपकेंद्र जर मारेगांव तालुक्यात झाले तर तालुक्यातील जनतेचा लाईन येण्या-जाण्याच्या समस्या पासुन कायम सुटका होणार आहे.मात्र या गंभीर विषयाकडे लोक प्रतिनिधी किती गांभीर्यानं लक्ष केंद्रित करते या कडे तालुक्यातील जनतेचे आता लक्ष लागले असुन तालुक्यातील हा गंभीर विषय लवकरात लवकर मार्गी लावावा अशी जनतेची मागणी आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर