वादळी वाऱ्याच्या पेंढरी येथे तडाखा..!

कडुलिंबाचे झाड विजेच्या तारावर कोसळल्याने तार तुटले.

जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात तार तुटले पण यात सुदैवाने कुटलीही जीवितहानी झाली नाही.

सुरेश पाचभाई मारेगाव,

मारेगाव तालुक्यातील पेंढरी येथे आज दिनांक 11 जुन 2023 रोज रविवारला सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास वादळी वाऱ्याच्या जोरदार तडाखा बसला असुन येथील कडुलिंबाचे झाड विजेच्या तारांवर पडल्याने गावातील LT लाईनचे तीन फेजचे तार जिल्हा प.शाळेच्या प्रांगणात तुटुन पडल्याची घटना घडली असुन

हि घटना आज सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास घडली.सुदैवात यात कुठलीही जीवित हानी झाली नाही.मारेगाव तालुक्यातील पेंढरी हे गाव महावितरण कार्यालय घोंसा (झरी जामणी) अंतर्गत येत असुन येथे आज जोरदार वादळी वाऱ्याचे आगमन झाले.

त्या मध्ये गावातील जिल्हा परिषद शाळेच्या बाजुला असलेले कडुलिंबाचे झाड विजेच्या तारांवर कोसळले या मध्ये तीन विजेचे फेज तारा जिल्हा प.शाळेच्या प्रांगणात तुटून पडले आहे.शाळेला सुट्या असल्याने शाळा बंद होती त्या मुळे सुदैवाने यात कुठलीही जीवित झाली नाही.सदर घटनेची माहिती जनमित्राला मिळताच तो घटणा स्थळी दाखल झाल्याची माहिती मिळाली आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!