ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

कृषीदिनी टीडीआरएफ द्वारा “एक जवान, एक वृक्ष”या उपक्रमाद्वारे वृक्षारोपण.

94 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

कृषी आणि निसर्ग,शेतकरी आणि वृक्ष दोघांचेही संगोपन म्हणजे राष्ट्रोन्नती – हरिश्चंद्र ब. राठोड संचालक टीडीआरएफ.

तालुका प्रतिनीधी :-झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी
[88059 79173]

झरी जामणी दरवर्षीप्रमाणे दि.१ जुलै रोजी कृषी दिन व हरित क्रांतीचे प्रणेते व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त TDRF द्वारा “एक जवान,एक वृक्ष” हा उपक्रम राबवून विदर्भातील वेगवेगळ्या कंपनीतील(तालुक्यांमधील) सर्व TDRF अधिकारी व जवान

यांनी आपल्या घराच्या अंगणात तसेच आजूबाजूच्या परिसरात सोबतच मोकळ्या जागेत व ज्या ठिकाणी झाड नाही अशा विविध उपयोगी वृक्ष लावून त्याच्या संगोपनाची जबाबदारी घेऊन त्यांची निगा राखण्याचे संकल्प घेतले.या उपक्रमाच्या माध्यमातून मुकुटबन तालुक्यातील TDRF जवानांनी TDRF संस्थापक तथा संचालक हरिश्चंद्र राठोड यांच्या नेतृत्वात मार्गदर्शनात आदर्श हायस्कूल परिसरात व विविध ठिकाणी वड, पिंपळ,कडूनिंब, निंबु,सीताफळ, इ.उपयोगी वृक्षांची लागवड केली.

या उपक्रमाच्या प्रकल्प अधिकारी म्हणून TDRF जनसंपर्क अभिषेक राजहंस कार्यरत होते. सोबतच TDRF मुख्य क्षेत्रीय अधिकारी मुस्कान सय्यद, वेदिका येरकाडे,हर्षाली मालेकार,राजेश्री बोधे, समिक्षा महाकुलकर इ. जवानांनी विशेष कार्य केले.या उपक्रमाला आदर्श हायस्कूल मुकुटबन चे मुख्याध्यापक कोंगरे सर,शिक्षक लेडांगे सर उपस्थित होते.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर