ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

झरी येथे लाईनमन दिवस उत्साहात साजरा.

71 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

तालुका प्रतिनीधी :-झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी
[88059 79173]

झरी (जामनी) प्रथमतःच या वर्षापासूनच जाहीर झालेला “लाईनमन दिवस”चार मार्च रोजी महावितरणच्या झरी उपविभागात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.

विजेसारख्या अती महत्वाच्या क्षेत्रात जिवाची बाजी लावून अहोरात्र वीजपुरवठा सुरळीत ठेवणार्या लाईनमन प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी 4 मार्च हा दिवस “लाईनमन दिवस” म्हणून पाळण्याचे शासनाने ठरविले आहे.

जामणी येथील महाकाली मंदिर परिसरातील पटांगणात मुकुटबन,घोन्सा व पाटण या तीनही वीज वितरण केंद्रातील व झरी उपविभागातील सर्व कर्मचाऱ्यांनी मिळून हा कार्यक्रम साजरा केला.यावेळी उपकार्यकारी अभियंता मांगीलाल राठोड यांनी लाईनमन भास्कर देवगडे,अरविंद कापसे,राम गोवारदीपे यांचेसह सर्व कर्मचाऱ्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला.

उपस्थितांनी मनोगत व्यक्त करतांना वीज ग्राहकास चांगल्यात चांगली सेवा देऊन भविष्यातील ऊर्जा क्षेत्रातील आव्हाने पेलण्याचा संकल्प केला.या कार्यक्रमास सहाय्यक अभियंता हेमंत लटारे,पंकज नंदलवार व सचीन महल्ले उपस्थित होते.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर