ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

कृषी विभागामार्फत वनराई बंधाऱ्यांची मोहीम.

83 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

आजपर्यत लोकसहभागातून ९० बंधारे तयार.

तालुका प्रतिनीधी :-झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी
[88059 79173]

ग्रामस्थ,सेवाभावी संस्था,शाळा,सहकारी संस्था,महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांना वनराई बंधारे बांधण्याचे तालुका कृषी अधिकारी अमोल आमले यांचे आवाहन.

झरी जामणी:उपविभागीय कृषी अधिकारी पांढरकवडा जगन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली झरी तालुक्यात वनराई बंधारे बांधण्याची मोहीम घेण्यात आली आहे.आजादी का अमृत महोत्सव व बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्ताने वनराई बंधारा पंधरवडा साजरा करण्यात येत आहे.

या दृष्टीने तालुक्यात कृषी विभाग व ग्रामवासी एकत्र येत वाहणाऱ्या पाण्यात वनराई बंधारा श्रमदानातून बांधण्यात येत आहेत. या अभियानाची सुरुवात सुर्ला,येथून बळीराजा साठी या कार्यक्रमात अंतर्गत राठोड यांनी वनराई बंधाऱ्याचे महत्त्व गावकऱ्यांना पाठवून दिले त्या प्रसंगी गावच्या सरपंच उषाताई कुडमेथे तालुका कृषी अधिकारी अमोल आमले उपसरपंच चंद्रशेखर मेश्राम पोलीस पाटील,मंडळ कृषी अधिकारी हटवार, कृषी पर्यवेक्षक किनाके, फुललेले कृषी सहाय्यक दिलीप पोळ सुधीर मोघे ,मेश्राम राजू कुडमेथे बेरळीकर, प्राची उईके, कुमरे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आतापर्यंत कृषी विभागामार्फत श्रमदानातून 25 गावांमध्ये जवळजवळ 90 वनराई बंधारे लोकसहभागातून बांधण्यात आले आहेत. पुढील पंधरा दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणावर यावर काम होणार आहे. यामुळे उन्हाळ्यात जाणवणारे पाण्याचे दुर्भिक्ष कमी होण्यास मदत होणार आहे परिसरातील विहिरींच्या व बोरवेलच्या पाण्याच्या पातळीत वाढ होणार आहे.

गुरांसाठी, महिलांना कपडे धुण्यासाठी याचा वापर करता येईल उन्हाळ्यामध्ये विहिरींच्या,बोरवेलच्या पाण्याची पातळी घटत असल्याने पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत होते.यादृष्टीने येथून वाहणाऱ्या पाण्यात बंधारा बांधल्यास पाणी आडवा पाणी जिरवा या संकल्पनेतून पाण्याचा साठा होऊन पिकांना एक ते दोन संरक्षित पाणी रब्बी व उन्हाळी पिकांना देता येईल मोटार इंजिन साठी महाडीबीटी मधून अनुदानही मिळते.

प्रतिक्रिया..

सिमेंटची खताची रिकामी गोणी रेती व काळी माती वापरून वनराई बंधारा तयार करावयाचा असतो.वाळू भरलेली पोती एकावर एक थरामध्ये रचताना सांधे मोड करून रचावयाची आहेत. एका वनराई बंधाऱ्याद्वारे एक ते दोन हेक्टर क्षेत्रात संरक्षित सिंचन उपलब्ध होईल व यासाठी लागणारा खर्चही काही होत नाही. गरज आहे ती ग्रामस्थांनी, सेवाभावी संस्था, शाळा,सहकारी संस्था व महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांनी एकत्र येण्याची. या मोहिमेमध्ये शासनाच्या सर्व विभागांनी एकत्र येऊन सहभागी व्हावे असे आवाहन तालुका कृषी अधिकारी अमोल आमले यांनी केले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर