ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

वन्यप्राणी निलगायचे मास बाळगल्याने कारावासाची शिक्षा.

81 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

तालुका प्रतिनीधी :-झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी
[88059 79173]

झरी जामणी:- वन्यजीव निलगाय मास बाळगल्याने आरोपी नामे भिमराव अय्या कुमरे रा.जुनोनी ता.झरीजामणी जि.यवतमाळ यास तीन महीने साधा कारावास व पाचशे रुपये दंडाची शिक्षा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्री बी.एस.वाढई यांनी दि.०३/०७/२०२३ रोजी सुनावली आहे.

सविस्तर वृत्त असे की..
दि.१४.१२.२०१२ रोजी सकाळी ९.३० वाजताचे दरम्यान एच.एल.कांबळे सहाय्यक वनसरंक्षक पांढरकवडा यांना गुप्त माहिती मिळाली कि मौजा जुनोनि ता.झरी येथे निलगाय मासांची अवैधरित्या विक्री चालु आहे.

वरुन त्यांनी त्यांचे कर्मचारी घेवुन जुनोनि गावात आले व संशयावरून आरोपी भिमराव अय्या कुमरे यांचे घराची झडती घेण्यासाठी वनरक्षक आंबेकर याची नियुक्ती केली वरुन आंबेकर यांनी पंच्यासमक्ष घरझडती घेतली असता घरातुन व स्नानग्रुहातुन निलगाय वन्यप्राण्याचे अंदाजे दोन किलो कच्चे मास तसेच जाळी,बाईडींग ताराचे फासे,बँटरी,टोपली असे शिकार साहित्य जप्त केले व शिकारी करीता ईतर करीता ईतर आरोपी नामे सूर्यभान लक्ष्मण आत्राम, रामेश्वर भिमा उईके,विश्वनाथ वाघुजी गेडाम हे सहकार्य केल्याने सर्व आरोपी विरुध्द एच.एल.कांबळे यांनी वन्यजीव सरक्षंण अधिनियम १९७२ चे कलम ९,३९,४४,५२,अंतर्गत वनगुन्हा दाखल करुन प्राथमिक तपास केला

व उर्वरीत तपास तत्कालीन वनपरिक्षेत्र अधिकारी वाय.बी.नागुलवार यांनी करुन प्रकरण न्यायप्रविष्ठ केले प्रकरणात सरकारी पक्षाचे वतीने फिर्यादी,पंच नामे प्राचार्य रमजान विराणी,वनरक्षक आंबेकर,वनपाल पी.व्ही.सोनुले यांचे सह पाच साक्षदारांचे पुरावे नोंदविण्यात आले साक्षदाराचे बयाण ग्राह्य धरुन न्यायालयाने आरोपी नामे भिमराव कुमरे यास वरील प्रमाणे शिक्षा सुनावली व ईतर आरोपींना निर्दोष मुक्त केले यात सरकारी पक्षाचे वतीने सहाय्यक सरकारी वकील श्री.पी.डी. कपुर यांनी काम पाहिले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर