ब्रेकिंग न्यूज
Konkan Railway: कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी गुड न्यूज, विशेष रेल्वेला अतिरिक्त थांबे, पण कुठे? पतीच्या व्हॉट्सॲपवरून नंबर घेतला, त्याला अडचण सांगितली, 26 वर्षांच्या विवाहितेला ‘ती’ चूक भोवली, छ. संभाजी… FDA News | अन्नाच्या नावाखाली काळा धंदा! FDA कडून पर्दाफाश | Tukaram Mundhe News | Special Report Satish Maratha Murder : ‘प्रत्येक चौकात मीच टिकणार…’, सतीश मराठावर 39 सपासप वार करण्याआधी राहुलचा शेवटचा … Lumpy Skin Disease : जनावराला ताप अन् शरीरावर सूज, असू शकतो लम्पी आजाराचा धोका, अशी घ्या काळजी Video पुणेकर वाहतूक कोंडीचं टेन्शन सोडा! पाषाण ते कोथरूड अवघ्या 10 मिनिटांत, नेमका प्लॅन काय? ‘ओम नम: शिवाय’चा जप करत पोरानं मैदानात घातला तांडव! मॅच जिंकून दिली, कोण आहे वंश बेदी? पाहा Video Raj Thackeray News | तिसरी मुंबई कुणासाठी? राज ठाकरेंचा सवाल! | Special Report पत्नी अन् लेकरांना सोडून पोटाची खळगी भरण्यासाठी गाठलं महाराष्ट्र; पण कामावर जाताच संदीपसोबत भयंकर घडलं PM Kisan Samman Nidhi : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! ‘या’ एका चुकीमुळे थांबणार पीएम-किसानचे ६,००० रुपये!
SP News Maregaon

बुरांडा-खापरी रस्ता जलमय व चिखलमय.

130 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

रस्त्यात चिखलाचे,गिट्टीचे व खड्याचे साम्राज्य.

अर्धवट कामामुळे खापरी ग्रामस्थ त्रस्त.

विदर्भ एस. पि. न्युज नेटवर्क मारेगांव,

सविस्तर वृत्त असे की..
मारेगांव तालुक्यातील बुरांडा ते खापरी रस्त्याचे काम पंधरा वर्षानंतर करण्यात आले होते.पण अडीच किलोमीटर पैकी फक्त दोन किलोमीटर रस्त्याचे काम करण्यात आले आहे.आणी उर्वरीत अर्धा किलोमीटर रस्त्यावर चिखल खड्डे व गिट्टीचे साम्राज्य निर्माण झाले आहे.

मारेगाव तालुक्यातील खापरी येथे जाण्याकरिता हा एकमेव मार्ग असुन अखेरची घटका मोजत आहे.पाऊसामुळे अर्धा किलो मीटर रस्त्याची अवस्था एवढी बिकट झालेली आहे.की वाहन दुरच राहीले पण पायदळ चालणे सुद्धा कठीण होऊन बसले आहे.जिल्हा परिषद अंतर्गत येत असलेल्या खापरी ते बुरांडा रस्ता हा गेल्या वर्षी पंधरा वर्षांनंतर तयार करण्यात आला आहेत.

पण तो ही केवळ दोन किलोमीटर रस्त्याचे काम करण्यात आले आहे.उखळलेल्या रस्त्याने अनेकांच्या दुचाकी पंचर होत आहे.गावात चार चाकी वाहन येणे तर दुरच राहिले एखाद्याचे आरोग्य बिघडल्यास त्याला येथुन तालुक्याच्या ठिकाणी येण्यास मोठी कसरत करावी लागत आहे.आणि बाहेरगावी शाळेत ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांना चिखल खड्यामुळे अथक त्रास सहन करावा लागला आहे.सन 2021- 2022 च्या मे महिन्यात अडीच की.मी.पैकी फक्त दोन किलोमीटर रस्त्याचे काम करण्यात आले होते.

उर्वरित अर्धा की.मी.रस्ता पूर्णताहा उखडून चिखल खड्डे तयार झाले आहे.या रस्त्याने पायदळ चालने सुद्धा कठीण बाब आहे.अर्धवट काम झाल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.या रस्त्याने ये -जा करणाऱ्याला वाटते की रस्त्यात खड्डे की खड्यात रस्ता हा रस्ता जिल्हा परिषद अंतर्गत येत असुन उर्वरीत अर्धा किलोमीटर रस्ता लवकरात लवकर करण्यात यावा अशी गावातली नागरिकांनची मागणी आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर