ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

वीज पडून बैल ठार

187 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

आकापुर शेतशिवातील घटना

सुरेश पाचभाई मारेगाव,

मारेगांव तालुक्यातील आकापुर येथील शेतशिवारात विज पडून बैलाचा मृत्यू झाल्याची घटना आज दिनांक २२ एप्रिल २०२४ रोज  सोमवारला सायंकाळी ५:३० वाजताच्या सुमारास घडली.वीज पडून बैल मरण पावल्याने शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झालेले आहे.

तालुक्यात मागील काही दिवसापासून तापमानात कमालीची वाढ झाली होती अशातच आज तालुक्यात अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली.वादळवारा आणि गारांसहित पावसाला सुरुवात झाली.अचानक सुरु झालेल्या गारपीटमुळे शेतकरी आणि नागरिकांची मोठी धावपळ सुरु झाली.गावातली अनेकांचे पशुधन उन्हाळ्याचे दिवस असल्याने शेतामध्ये मोकाट किंवा शेतातील बंड्यामध्येच बांधले जातात.अशातच आज अचानक दुपारी आकाशात ढग दाटून आले. विजांचा कडकडाट सुरु झाला व सोसाट्याच्या वाऱ्यासह, गारा पावसाने दमदार हजेरी लावली.

आकापूर येथील नारायण पुंडलिक खंडाळकर यांचे कडे ५ एकर शेती लाखापुर शिवारात आहे.उन्हाळ्याचे दिवस असल्याने त्याचे बैल ते राहत असलेल्या आकापूर गावातील शेतीवरच चरण्यासाठी गेले होते. ह्या शेतकऱ्याच्या एका बैलावर शेतशिवारात विज कोसळून बैल जागीच ठार झाला.शेतीचा हंगाम काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. बैल मरण पावल्याने शेतकऱ्याचे  अंदाजे ५५ हजार रुपयाचे आर्थिक नुकसान झाले आहे.वृत्त लिहिपर्यंत पंचनामा व्हायचा होता.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर