ब्रेकिंग न्यूज
⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं?
SP News Maregaon

जगातील टॉप टेन शास्त्रज्ञांमध्ये झरी जामणी च्या तरुणाने पटकावले स्थान,’काळ्या सोन्या’चा लावला शोध.

126 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)


तालुका प्रतिनीधी :-झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी
[88059 79173]

झरी जामणी तालुक्यातील मांगलीच्या जिल्हा परिषद शाळेत शिकून जगाला नवे संशोधन देणाऱ्या या तरुण शास्त्रज्ञाचा समावेश आता जगातल्या दहा सर्वोत्तम संशोधकांमध्ये झाला आहे.

वातावरणात प्रदूषण वाढविणारा कार्बन डायऑक्साईड शोषून घ्यायचा,तो सोन्याच्या अतिसूक्ष्म कणात साठवायचा,त्यातून ‘काळे सोने’ मिळवायचे आणि त्यातून हरित इंधन तयार करायचे… असे लोकोपयोगी संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञाचा जगातील टाॅप टेन शास्त्रज्ञांमध्ये समावेश झाला आहे.

कोण आहेत हे शास्त्रज्ञ? त्यांचे नाव आहे डाॅ.विवेक पोलशेट्टीवार आणि ते आलेत झरी तालुक्यातील मांगली नावाच्या छोट्याशा खेड्यातून..! मांगलीच्या जिल्हा परिषद शाळेत शिकून जगाला नवे संशोधन देणाऱ्या या तरुण शास्त्रज्ञाचा समावेश आता जगातल्या दहा सर्वोत्तम संशोधकांमध्ये झाला आहे.

जर्मनीतील ‘फॉलिंग वॉल्स’ या अत्यंत प्रतिष्ठित वैज्ञानिकांच्या सोसायटीतर्फे दरवर्षी जगभरातील तरुण संशोधकांतून उत्कृष्ट शास्त्रज्ञांची निवड केली जाते.त्यात यंदा हजार शास्त्रज्ञांमधून डॉ.विवेक पोलशेट्टीवार यांच्यासह अन्य नऊ शास्त्रज्ञांची निवड करण्यात आली.त्यांना नोव्हेंबरमध्ये बर्लीन येथे ‘फॉलिंग वॉल्स’ पुरस्काराने त्यांना हार्वर्ड,येल,आयबीएम,ईटीएच,एमआयटी आणि मॅक्स प्लँक येथील नामांकित शास्त्रज्ञांसह सन्मानित केले जाणार आहे.

विवेक पोलशेट्टीवार हे झरी तालुक्यातील मांगली या गावचे रहिवासी आहेत.त्यांनी सातवीपर्यंतचे शिक्षण गावातच जिल्हा परिषद शाळेत घेतल्यानंतर वणीत बीएसस्सी आणि अमरावतीमध्ये एमएसस्सी केले.ग्वाल्हेरमध्ये पीएचडी केली. त्यानंतर फ्रान्स,अमेरिकेत सखोल संशोधनाचे काम केल्यावर परदेशी नोकरीच्या अनेक संधी खुणावत असताना त्यांनी देशातच सेवा देण्याचा निश्चय केला आणि मुंबई येथे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चमध्ये ग्रीन केमेस्ट्री या क्षेत्रात मुलभूत संशोधनावर काम करीत आहेत.

असे आहे संशोधन नॅनो टेक्नॉलॉजी वापरून विवेक पोलशेट्टीवार यांनी सोन्याच्या नॅनो कणांमधील आकार आणि अंतर बदलून पिवळ्या सोन्याचे काळ्या सोन्यात रूपांतर केले.एखादे झाड ज्याप्रमाणे वातावरणातील कार्बन डायऑक्साईड शोषून घेते, त्याच प्रमाणे हे काळे सोनेही कार्बन डायऑक्साइड शोषून घेते.

या काळ्या सोन्याच्या आधारे कार्बनडाय डायऑक्साईड, सूर्यप्रकाश आणि पाण्यातील हायड्रोजन एकत्र साठवून त्यांच्यावर प्रक्रिया करून त्यातून मिथेनसारखे इंधन तयार केले जात आहे.प्रदूषण टाळणारे इंधन उत्पादित करणारे कृत्रिम झाड म्हणून या ब्लॅक गोल्डचा पुढील काळात वापर होणार आहे.पोलशेट्टीवार आता या तंत्रज्ञानाचे व्यावसायिकीकरण करण्याचा प्रयत्न करत आहेत.

“कार्बन डायऑक्साइडचे संग्रहण आणि पाण्यातील ऑक्सीजनपासून हायड्रोजन वेगळा करणे कठीण काम होते. तर सौरउर्जा साठविणे महाकठीण काम होते.ही प्रक्रिया म्हणजे एक प्रकारचे कृत्रिम प्रकाश संश्लेषणच.पण आम्ही तयार केलेल्या ब्लॅक गोल्डमुळे ही प्रक्रिया शक्य झाली.आता त्यातून हरित इंधन तयार होणे शक्य आहे.लॅबमध्ये हा प्रयोग यशस्वी झालाय डॉ. विवेक पोलशेट्टीवार, संशोधक 

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर