ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

अजूनही 2941 शेतकरी इ के वाय सी आणि आधार संलग्नविना.

88 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

12 सप्टेंबर पर्यंत इ के वाय सी करण्याचे आवाहन.

सुरेश पाचभाई मारेगाव,

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत तालुक्यातील 2941 शेतकरी अजूनही इ के वाय सी तसेच बँक खाते आधार संलग्न नसल्याचे आढळून आले.या सर्व शेतकऱ्यांनी 12 सप्टेंबर पर्यंत आपले खाते इ के वाय सी तसेच आधार नोंदणी करून घ्यावे असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 14 व्या हप्त्याचे नुकतेच वितरण करण्यात आले. यासाठी पात्र लाभार्थ्यांचे ekyc व बँक खाते आधार संलग्न (NPCI seeded ) करणे व भूमी अभिलेख नोंदी अद्ययावत करणे या बाबी शासनाने बंधनकारक केलेल्या आहे.ज्या लाभार्थ्यांनी आजपर्यंत ekyc केले नसेल तसेच बँक खात्याला आधार संलग्न केले नसेल असे लाभार्थी या योजनेच्या लाभापासून वंचित राहणार आहे.

कृषी विभागातर्फे ekyc व बँक खाते आधार संलग्न करणेसाठी मोहीम राबवण्यात आली आहे.तरीही तालुक्यामध्ये आजपर्यंत 2077 लाभार्थीची ekyc व 864 लाभार्थी यांचे बँक खाते आधार संलग्न करणे प्रलंबित असल्याचे दिसून येते.प्रत्येक विभागामार्फत वेगवेगळे प्रयत्न करुनसुद्धा लाभार्थी ekyc व बँक खाते आधार संलग्न करण्याकरिता प्रतिसाद देत नाही अशा लाभार्थीना पोर्टल वरून वगळण्यात यावे अशा सूचना प्राप्त झालेल्या आहे.

तरी समोरील होणारे नुकसान टाळण्यासाठी 12 सप्टेंबरच्या आत सर्व लाभार्थ्यांनी ह्या बाबी पूर्ण करणे महत्वाचे आहे.जर एवढे प्रयत्न करूनही लाभार्थी ह्या बाबी पूर्ण करणार नसेल आणि प्रतिसाद देत नसेल तर अशा लाभार्थीची नावे रद्द करण्यात येईल असे आवाहन तालुका कृषी अधिकारी मारेगाव यांनी केले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर