ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

दोन दुचाकींची समोरासमोर धडक : एक ठार चार गंभीर

172 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

सुरेश पाचभाई मारेगाव,

मारेगाव तालुक्यातील दापोरा जवळील कोसारा फाट्याजवळ दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन एक जण ठार तर,चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज दिनांक १८ जून २०२४ रोज मंगळवारला रात्री 8 वाजताच्या सुमारास दापोरा च्या समोर सुदाम देव कोसारा फाट्यावर घडली.

मिळालेल्या माहितीनुसार,विचोड बोरी येथील शंकर गमे (अंदाजे वय 35) आणि त्याचा सहकारी कुणाल खीरटकर,25 हे दुचाकीने वणी वरून लग्न कार्य करून गावाकडे येत होते.याचवेळी दापोरा येथील गणेश आत्राम,30,संदीप कुडमेथे,30 आणि दापोरा येथे पाण्याच्या टाकीचे काम करणारा मिस्त्री असे तिघेजन दापोरा येथे परत येत होते. दापोरा फाट्याजवळील सुदाम देव फाट्याजवळ यांच्या दुचाकी एकमेकांना धडकल्या.या अपघातात शंकर गमे रा.वीचोडबोरी हा जागीच ठार झाला तर,चार जण जखमी झाले.

मजखमीमध्ये एक छत्तीसगडी कामगार असून जखमी इसमाना मार्डी येथील रुग्णालयात प्राथामिक उपचारास दाखल करून मारेगाव येथे रवाना करण्यात आले अशी माहिती मिळाली आहे.तर कुणाल खीरटकर याला वणी येथे उपचारासाठी हलविण्यात आल्याची माहिती आहे.सदर घटनेची माहिती मारेगाव पोलिसांना कळताच पोलीस लगेच घटनास्थळी दाखल झाले.या घटनेने विचोडबोरी येथे शोककळा पसरली. घटनेचा तपास ठाणेदार शंकर पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली ए.एस.आय.भालचंद्र मांडवकर,पो.का.सागर दिपेवार करीत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर