ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

नवरगाव (धरण) येथे शंकरपटाचे उद्घाटन.

81 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

अरविंदभाऊ ठाकरे सरपंच कुंभा यांचे हस्ते करण्यात आले.

सुरेश पाचभाई मारेगाव : नवरगांव (धरण)येथे आज दिनांक 24 फेब्रुवारी 2023 रोज शुक्रवारला श्री तुळशी वृंदावन देवस्थान येथे सकाळी 11 वाजता सत्यपाल महाराज यांचे शिष्य सप्तखंजरीवादक,राष्ट्रीयप्रबोधनकार तुषार सूर्यवंशी नागपुर (दुरदर्शन, झी मराठी कलाकार) यांचा तुफान विनोदी प्रबोधनात्मक कार्यक्रम येथे संपन्न झाला व दुपारी 1 वाजता गोपाल काला करण्यात आला.

त्यानंतर दुपारी 3:30 वाजताच्या सुमारास शंकरपटाला सुरुवात करण्यात आली. महाशिवरात्रीच्या दिवशी या मंदिरात घटस्थापना करण्यात आली होती.दिनांक 28 फेब्रुवारी रोज मंगळवारला पाखडपुजा व घट विसर्जन करण्यात येणार असल्याची माहिती कमिटी कडून प्राप्त झाली आहे.
आजपासून सुरु झालेल्या या यात्रेमध्ये आज भव्य शंकरपटाचे उद्घाटन अरविंदभाऊ ठाकरे, सरपंच कुंभा यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपअध्यक्ष संजय देरकर हेही उपस्थित होते.

दिनांक 24,25 व 26 हे तीन दिवस भव्य शंकरपट भरणार आहे.तसेच भव्य यात्रेला पण आज पासुन सुरुवात झाली आहे. परिसरातील भाविकाना यात्रेचा आनंद घेता येणार आहे.श्री क्षेत्र तुळशी वृंदावन देवस्थान नवरगांव धरण रजिस्टर नंबर ए. 392 द्वारा 24 ते 28 फेब्रुवारी पर्यंत या भव्य यात्रा उत्सवाला आज पासुन सुरुवात करण्यात आली आहे.

दिनांक 28 फेब्रुवारी रोजी पाखडपुजा व घट विसर्जन करण्यात येणार असल्याची माहीती व्यवस्थापन कमेटी व आयोजन समिती श्रीकृष्ण तुळशी वृंदावन देवस्थान, नवरगांव (धरण) ता. मारेगांव जि. यवतमाळ र.नं. ए-३९२ यांचे कडून प्राप्त झाली आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर