ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

देवकार्य करण्यासाठी गेलेल्या एक युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू.

79 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

सावंगी येथील संगमा वरील घटना.

गजानन आसुटकर मारेगाव.

मारेगांव तालुक्यातील सावंगी येथे देवकार्यासाठी वर्धा नदीवर अंघोळीसाठी गेलेल्या एका युवकाचा काल दिनांक 5 मे 2023 रोज शुक्रवारला सकाळी 7 वाजताच्या सुमारास पाण्यात बुडलेल्या युवकाचा काही तासांनी मृत्यूदेह सापडला तर दोघांना वाचवण्यात यश मिळाले.सदर घटना यवतमाळ,चंद्रपूर जिल्याना जोडणाऱ्या सावंगी येथील संगमावर घडली असून वाहून गेलेल्या व्यक्तीचा शोध काही तास सुरु होता अखेर त्याचा मृतदेह 3:30 वाजताच्या सुमारास सापडला.

मारेगांव तालुक्यातील सावंगी येथे वर्धा आणि वना नदीचा संगम आहे.अनेक जण पवित्र कार्यकरण्यासाठी या संगमावर येत असतात.चंद्रपूर आणि यवतमाळ अशा दोन जिल्ह्यांना जोडणारा हा संगम आहे.चंद्रपूर जिल्ह्यातील नदीकाठावरील दिंदोड़ा घाटावर वरोरा तालुक्यातील बामर्डा येथील एका समाजाचे देवकार्य होते.त्यानिमित्ताने विवेक अमर येडमे वय सुमारे 22 वर्ष असे नदीच्या पात्रात बुडून मृत्यू झालेला युवकाचे नाव असून तो त्यांचा परिवार व आपसी नातेवाईक हे या देवकार्याला आंघोळीसाठी येथील संगमावर जमलेले होते.

त्यासाठी त्यांचे नात्यातील असलेले मारेगाव तालुक्यातील कोसारा येथील येडमे कुटुंबीयही जमलेले होते.वर्धा नदीच्या संगमावर आंघोळीसाठी ते पाण्यात उतरले.परंतु पाण्याचा अंदाज न आल्याने एक जण बुडाला व त्यातील दोघांना वाचवण्यात यश मिळाले होते.परंतु विवेक हा बेपत्ता झाला होता त्याचा शोघ घेण्यासाठी NDRF च्या टीमला चंद्रपूर येथून पाचरण करण्यात आहे. होते काही तासा नंतर त्यांचा मृतदेह आढळला असुन या घटनेची माहिती मारेगाव पोलिसांना मिळताच पोलीस घटनस्थळी दाखल झाले पंचनामा करून त्याला उत्तरीय तपासणी साठी मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले.या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार राजेश पुरी यांच्या मार्गदर्शनात भालचंद्र मांडवकर, विकास खंदारे करत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर