ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,मारेगांव चे NAAC बेंगलोर कडून मूल्यांकन.

198 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

विदर्भ एस पि न्युज नेटवर्क: मारेगाव,

कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, मारेगांव येथे दिनांक 26 व 27 सप्टेंबर 2023 रोजी NAAC बंगलोरकडून आलेल्या कमिटी मार्फत मूल्यांकन करण्यात आले. दोन दिवसीय मुल्यांकन प्रक्रियेमध्ये सदर कमिटीने माजी विद्यार्थी ,पालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, संस्थाचालक व विद्यापीठ प्रतिनिधी सोबत चर्चा केली.

समारोपीय कार्यक्रमात कमिटी द्वारे महाविद्यालयाचा परिसर, महाविद्यालयाची ईमारत व भौतिकसुविधा उत्कृष्ट आहेत असा उल्लेख केला. तसेच सन्माननीय प्राचार्य महोदय प्रा. डॉ. अविनाश घरडे यांचे कार्य अतिउत्तम आणि मागील पाच वर्षाचे सादरीकरण अप्रतिम आणि दर्जदार असा शेरा देण्यात आला. महविद्यालयाच्या इंटर्नल क्वालिटी असुरन्स सेल चे समन्वयक डॉ. एन. आर. पवार चे सादरीकरन व सर्वच डिपार्टमेंटचे सादरीकरन दर्जात्मक होते असा उल्लेख कमिटीकडून करण्यात आला.

व्यवस्थापक मंडळाकडून महाविद्यालयाला अप्रतिम वास्तू उपलब्ध करून दिली असाही उल्लेख करण्यात आला.
सर्व सोयीने परिपुर्ण महाविद्यालय असा शेरा दिला.
*NAAC बेंगलोर* कडून 2016 मध्ये झालेल्या मूल्यांकनामध्ये सुद्धा उत्कृष्ट दर्जा प्राप्त झाला होता. तसाच आताही उत्कृष्ट दर्जा प्राप्त होईल असा आशावाद संस्थेचे अध्यक्ष मा. श्री जीवन पाटील कापसे व महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. अविनाश घरडे यांना आहे.

मूल्यांकनामध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश घरडे आय. क्यू. ए. सी. समन्वयक डॉ.एन. आर. पवार, आय. क्यू. ए. सी. सल्लागार डॉ. दिनेश गुंडावार, आय. क्यू. ए. सी. कमिटी चे सर्व सभासद, महाविद्यालयाच्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंदांनी अथक परिश्रम घेतले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर