ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

टिप्परच्या जीवघेण्या ओव्हरटेकमुळे पत्रकार गंभीर जखमी

6 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

निंबाळा फाट्याजवळ भीषण अपघात; हेल्मेटमुळे बचाव

सुरेश पाचभाई मारेगाव

मारेगाव – वणी मार्गावर बेदरकार टिप्परचालकांच्या वाढत्या दहशतीचे आणखी एक धक्कादायक उदाहरण शनिवारी (दि. २६ मार्च) दुपारी समोर आले. मारेगाव येथील पत्रकार ज्योतिबा पोटे हे दुचाकीने प्रवास करत असताना, निंबाळा फाट्याजवळील टाटा मोटर्स शोरूमसमोर एका भरधाव टिप्परने धोकादायक पद्धतीने ओव्हरटेक केल्याने भीषण अपघात घडला. या अपघातात ज्योतिबाजी पोटे गंभीर जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी सुमारे १ वाजण्याच्या सुमारास ज्योतिबा पोटे हे वणी येथून बँकेचे काम आटोपून मारेगावकडे परतत होते. याचवेळी मागून आलेल्या टिप्परने अतिवेगाने आणि नियमबाह्य पद्धतीने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. टिप्पर अंगावर येत असल्याचे लक्षात येताच पोटे यांनी दुचाकी बाजूला घेण्याचा प्रयत्न केला; मात्र वेगावर नियंत्रण सुटल्याने ते दुचाकीसह रस्त्यावर आपटले आणि काही अंतर फरफटत गेले.

या अपघातात त्यांच्या चेहऱ्याला, नाकाला तसेच शरीराच्या विविध भागांना गंभीर दुखापत झाली असून ते रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर पडले होते. स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदत करून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलवले.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, पोटे यांनी हेल्मेट परिधान केले असल्याने मोठा अनर्थ टळला. डोक्याला गंभीर इजा होण्यापासून त्यांचा बचाव झाला असून, हेल्मेटमुळेच त्यांना ‘पुनर्जन्म’ मिळाल्याची चर्चा परिसरात आहे.

दरम्यान, वणी–मारेगाव मार्गावर टिप्पर चालकांकडून वाहतुकीच्या नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याची तक्रार नागरिकांकडून वारंवार करण्यात येत आहे. बेदरकार ओव्हरटेक, अतिवेग आणि निष्काळजीपणामुळे अपघातांचे प्रमाण वाढत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

या प्रकरणी संबंधित टिप्पर चालकाविरोधात कडक कारवाई करण्यात यावी तसेच या मार्गावर वाहतूक नियंत्रणासाठी प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिक व पत्रकारांकडून करण्यात येत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर