ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

मारेगावात लाईनमन दिवस उत्साहात साजरा

2 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

महावितरणची धडाकेबाज जनजागृती रॅली

सुरेश पाचभाई मारेगाव

मारेगाव येथे आज ४ मार्च रोजी लाईनमन दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मर्यादित (महावितरण) कार्यालयात सकाळी विद्युत सुरक्षा प्रतिज्ञा घेऊन कार्यक्रमाची दमदार सुरुवात झाली.

सकाळी १० वाजता तहसीलदार उत्तमराव निलावाड यांच्या हस्ते बाईक रॅलीला हिरवा झेंडा दाखविण्यात आला. ही रॅली उपविभागीय महावितरण कार्यालयापासून सुरू होऊन आंबेडकर चौक, नगरपंचायत चौक, मार्डी चौक, राष्ट्रीय विद्यालय चौक, माधव नगरी व पोलीस स्टेशन मार्गे पुन्हा महावितरण कार्यालयात दाखल झाली.

या रॅलीचा मुख्य उद्देश वीज ग्राहकांमध्ये विद्युत सुरक्षेबाबत व्यापक जनजागृती करणे हा होता. शहरातून निघालेल्या या रॅलीने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.

रॅलीनंतर उपकार्यकारी अभियंता शामसुंदर कुर्रा यांच्या हस्ते सर्व कर्मचारीवृंदांचा सत्कार करण्यात आला. लाईनमन दिवसाचे औचित्य साधत सर्व वीज वितरण अभियंत्यांनी लाईनमन गणवेश परिधान करून त्यांच्या कार्याबद्दल आदर व्यक्त केला.

महावितरण कार्यालयात मनोरंजनासाठी कॅरम, बॅडमिंटन व इतर खेळांचे आयोजन करण्यात आले. सायंकाळी पाच वाजता कार्यालय परिसरात सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

लाईनमन हे वीज वितरण व्यवस्थेचे खरे शिल्पकार असून कोणत्याही संकटात जीव धोक्यात घालून सेवा देतात.

त्यांच्या कार्याचा गौरव करत मारेगाव महावितरणने साजरा केलेला हा लाईनमन दिवस प्रेरणादायी ठरला.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर