ब्रेकिंग न्यूज
उभ्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक; तरुण गंभीर जखमी मारेगावच्या वारंवार वीजखंडितीविरोधात नागरिक आक्रमक; सात दिवसांचा अल्टिमेटम Konkan Railway: कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी गुड न्यूज, विशेष रेल्वेला अतिरिक्त थांबे, पण कुठे? पतीच्या व्हॉट्सॲपवरून नंबर घेतला, त्याला अडचण सांगितली, 26 वर्षांच्या विवाहितेला ‘ती’ चूक भोवली, छ. संभाजी… FDA News | अन्नाच्या नावाखाली काळा धंदा! FDA कडून पर्दाफाश | Tukaram Mundhe News | Special Report Satish Maratha Murder : ‘प्रत्येक चौकात मीच टिकणार…’, सतीश मराठावर 39 सपासप वार करण्याआधी राहुलचा शेवटचा … Lumpy Skin Disease : जनावराला ताप अन् शरीरावर सूज, असू शकतो लम्पी आजाराचा धोका, अशी घ्या काळजी Video पुणेकर वाहतूक कोंडीचं टेन्शन सोडा! पाषाण ते कोथरूड अवघ्या 10 मिनिटांत, नेमका प्लॅन काय? ‘ओम नम: शिवाय’चा जप करत पोरानं मैदानात घातला तांडव! मॅच जिंकून दिली, कोण आहे वंश बेदी? पाहा Video Raj Thackeray News | तिसरी मुंबई कुणासाठी? राज ठाकरेंचा सवाल! | Special Report
SP News Maregaon

“महिला सक्षमीकरणाचा नवा संदेश: शिवसेना उबाठा व एकवीरा पतसंस्थेची भव्य इफ्तार पार्टी”

1 View
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

“इफ्तार पार्टीतून सामाजिक ऐक्याचा संदेश; किरणताई देरकर यांचे मत”

सुरेश पाचभाई मारेगाव

मारेगाव : पवित्र रमजान महिन्याच्या निमित्ताने सामाजिक एकात्मता, बंधुता आणि महिला सक्षमीकरणाचा प्रेरणादायी संदेश देणारा आगळावेगळा उपक्रम मारेगाव येथे पाहायला मिळाला. शिवसेना उबाठा पक्ष आणि एकवीरा महिला पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने १४ मार्च मारेगाव येथे महिलांसाठी भव्य इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले. किरणताई देरकर यांच्या पुढाकारातून पार पडलेल्या या उपक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

रमजानच्या पवित्र वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमात सामाजिक सलोखा, परस्पर आदर आणि महिलांच्या सक्षमीकरणाचा प्रभावी संदेश देण्यात आला. कार्यक्रमाला शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्या सौ. सुनंदाताई गुहे, शिवसेना महिला तालुका प्रमुख सौ. सुरेखाताई ढेंगळे, शहर संघटिका डॉ. सपना केलोडे, सय्यदजी कूबरा जहा, आलमजी आरा, फरसजहाजी शरीफ, डॉ. यास्मिन, नगरपंचायत सदस्या अंजुम शेख, अ‍ॅड. ह्युमेरा शरीफ तसेच मुस्कान शरीफ यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

कार्यक्रमादरम्यान मुस्कान शरीफ यांनी भावपूर्ण नात पठण सादर करून रमजान महिन्याचे आध्यात्मिक महत्त्व उपस्थितांना प्रभावी शब्दांत समजावून सांगितले. त्यांच्या सादरीकरणाने कार्यक्रमाला एक वेगळेच भावनिक आणि आध्यात्मिक स्वरूप लाभले.
यावेळी नगरपंचायत नगरसेविका वर्षाताई किंगरे, रश्मी चौधरी, रजनीताई बोढाले तसेच एकवीरा महिला पतसंस्थेच्या सचिव सौ. माधुरी नगराळे, विद्याताई मत्ते, सुरेखाताई भेले, मंगलाताई आसेकर, रंजनाताई येरगुडे, वंदनाताई दुमोरे, प्रतिभाताई डाखरे, विद्याताई भेले, जयश्री वरारकर, लता डाखरे,ऋतुजा यांच्यासह पतसंस्थेचे कर्मचारी आणि मोठ्या संख्येने मुस्लिम महिला उपस्थित होत्या.

पवित्र रमजान महिन्यात महिलांसाठी आयोजित करण्यात आलेली ही इफ्तार पार्टी सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि एकात्मतेचे जिवंत उदाहरण ठरली. “जनसेवा हीच ईश्वरसेवा” हा ध्यास घेत समाजहितासाठी सुरू असलेले कार्य अधिक लोकाभिमुख होत असल्याचा आनंद किरणताई देरकर यांनी व्यक्त केला.
भविष्यातही समाजात सौहार्द, एकता आणि महिला सक्षमीकरणाला बळ देणारे असे उपक्रम सातत्याने राबविण्याचा निर्धार यावेळी आयोजकांनी व्यक्त केला.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर