ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

वेगाव येथे गोठ्याला आग

155 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

– शेती साहित्य जळून खाक
– शेतकऱ्याचे अंदाजे दोन लाखाचे नुकसान

विदर्भ एस पि न्युज नेटवर्क:- मारेगांव,

घराला लागून असलेल्या गोठ्याला आग लागून
शेतकऱ्याचे अंदाजे दोन लाखाचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. सुदैवाने घराला आग लागता लागता वाचली.यात शेतकऱ्याचे शेतातील औजार आणि जनावरांचा चाऱ्यासहित दोन लाखाचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

मारेगाव तालुक्यातील वेगाव येथील शेतकरी उमेश लक्ष्मण कापसे यांच्या घराला लागूनच त्यांचा जनावरे बांधण्याचा गोठा आहे.या गोठ्यामध्ये त्यांचे जनावरे असायची.यात एक गाय, गोऱ्हा आणि कालवड तसेच जनावरांचा चारा,कुटार,शेतीसाठी लागणारे साहित्य,सोबत त्यांची घरची टू व्हीलर सुद्धा त्याच गोठ्यामध्ये ठेवलेली होती.सायंकाळी ते शेतामधून घरी आल्यानंतर त्यांनी आंघोळीसाठी गरम पाणी त्याच गोठ्यामध्ये केले आणि विस्तव पाणी टाकून वीझवला.

पण काल दिनांक 19 ऑक्टोंबर 2023 रोज गुरुवारला रात्री 12 वाजताच्या अचानक आग लागली या आगीमध्ये त्यांच्या गोठ्यातील जनावरांचा चारा जळून खाक झाला.आग लागताच गाय आणि कालवड दावे तोडून ते बाहेर पडले.पण त्या गोठ्यामध्ये असलेली टू व्हीलर,जनावरांचा चारा,कुटार जळले.आणि एक गोऱ्हा भाजला गेला.या आगीने एवढं रौद्र धारण केलं की ती आग गोठ्यातून त्यांच्या घराला लागली.अशातच त्यांच्या घरातील सोफा जळायला लागला.

लगेच घर मालकाच्या ही गोष्ट लक्षात येताच त्यांनी लगेच आग विझण्यासाठी प्रयत्न केला.सोफा बाहेर फेकला,सुदैवाने घरातील सिलेंडर सुद्धा त्यांनी बाहेर टाकले. घरात असलेल्या कापसाला मात्र आग लागली नाही यामुळे तो कापूस वाचला आणि मग लोकांनी आग विझवण्यास मदत केल्यामुळे आगीवर लवकर नियंत्रण आणण्यास मदत झाली. ही आग विझवताना उमेश कापसे यांच्या हातालाही जखम झाली. यात कापसे यांचे अंदाजे दोन लाखांवर नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर