ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

भाविकांचा ऑटो पलटला
आठ जखमी

130 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

-मारेगाव येथील तुळशीराम बार समोरील घटना

गजानन आसुटकर मारेगांव,

मारेगाव शहरापासून अवघ्या अर्धा कि.मी अंतरावर असलेल्या तुळशीराम बार जवळ भाविकांचा ऑटो पलटी झाल्याची घटना आज दिनांक 21ऑक्टोंबर 2023 रोज शनिवारला सायंकाळी 6:30 वाजताच्या सुमारास घडली.ऑटोला एक वृध्द आडवे आल्याने हा अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे.

सविस्तर वृत्त असे की..
सोमनाळा,ता.वणी येथील काही भाविक दि.21 ऑक्टोबरला सायंकाळी 6.30 च्या दरम्यान केळापूर येथील जगदंबेच्या दर्शनासाठी ऑटोने जात होते.मारेगाव येथील वणी-करंजी राज्य महामार्गावरील तुळशीराम बार जवळ एक वृद्ध व्यक्ती ऑटोला आडवा आला.त्यामुळे ऑटो चालकाचे ऑटो वरील नियंत्रण सुटले.वृद्धाला वाचविण्यासाठी ऑटो चालकाने जोराने दोन्ही ब्रेक मारले.त्यामुळे ऑटोने दोन पलटी खाल्या.

यात ऑटो मधील 8 व्यक्ती जखमी झाले असुन चिंतामण कोवे वय सुमारे 75 वर्ष रा.मारेगाव असे ऑटोला आडवे आलेल्या वृद्धाचे नाव आहे.तर अरबाज खान,गीता भंडारकर,आचल आत्राम,पूजा टेकाम,विधी कळसकर,संतोषी चटपलीवार,मनीषा चटपल्लीवार हे सर्व रा. सोमनाळा अशी अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींची नावे आहेत.

रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या काही नागरिकांनी सदर घटनेची माहिती मारेगाव पोलीसांना दिली व त्यांना लगेच मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले तेथील डॉक्टरांनी प्रथम उपचार करून काही भक्तांना पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथील स्थलांतरीत केल्याची माहिती आहे. या घटनेचा पुढील तपास मारेगाव पोलीस करत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर