ब्रेकिंग न्यूज
⚡ Pune Court Firing Case: ज्या कारणाने ‘गेम’चा प्लॅन झाला, त्या शुभम चव्हाण हत्या प्रकरणात मंदारची काय भूमिका… ✦ ⚡ ब्रेकिंग अपडेट : जळका अपघातातील गंभीर जखमी पतीचाही मृत्यू; पती-पत्नी दोघांचाही दुर्दैवी अंत! ✦ ⚡ Pune Court Murder Case: कात्रजमध्ये २० एप्रिल २०२५ रोजी काय घडलं होतं? त्याचा बदला घेण्यासाठी दीड वर्ष वाट… ✦ ⚡ जळका बसस्टॉपवर कार-दुचाकीची भीषण धडक; महिलेचा मृत्यू, पती गंभीर जखमी! ✦ ⚡ Special Report | Indrayani Rice|इंद्रायणी तांदूळ महागणार! किलोमागे ३० रुपयांची दरवाढ होण्याचा अंदाज ✦ ⚡ MPSC Recruitment: सरकारी नोकरीची ही संधी सोडू नका! 16717 पदांसाठी मेगा भरती, कसा करायचा अर्ज? जाणून घ्या सं… ✦ ⚡ MPSC Recruitment: सरकारी नोकरीची ही संधी सोडू नका! 16717 पदांसाठी मेगा भरती, कसा करायचा अर्ज? जाणून घ्या सं… ✦ ⚡ चोपण गावात काकड आरतीचा भक्तिमय जागर! ✦ ⚡ ‘तो’ भेटायला बोलवायचा अन् सारखं ठिकाण बदलायचा, ‘इन्स्टा’चा मेसेज पाहून ती गेली, पण भावांनी…, छ. संभाजीनगर… ✦ ⚡ Solapur: लग्न करतो म्हणाला, अल्पवयीन मुलीला घरातून पळवलं अन् नको तेच केलं, आरोपीला मोठी शिक्षा
SP News Maregaon

अवकाळी पावसाने व ढगाळ वातावरणाने कापुस,तुर पीक धोक्यात

170 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

किडीचा सुध्दा प्रादुर्भाव : शेतकरी हवालदिल

सुरेश पाचभाई मारेगाव,

मारेगाव तालुक्यात 5 हजार 297 हेक्टर वर तुरीची लागवड करण्यात आली असुन तुर बहरली परंतु मागील काही दिवसापासून ढगाळ वातावरणा सह पाऊस पडत असल्याने याचा परिणाम थेट कापुस,तुरी,गहु ,चना या पिकांवर जाणवायला लागला असुन किडींचा सुध्दा प्रादुर्भाव असल्याने तूर उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.त्यामुळे पुन्हा एकदा शेतकरी संकटात सापडण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.

सततच्या नापिकीमुळे त्रासलेल्या शेतकऱ्यावर नेहमीच संकटाची टांगली तलवार असते.वातावरणात होणार बदल जर कोणाला जाणवत असेल तर तो सर्वात आधी शेतातील पिकावर जाणवायला लागतो.अशीच परिस्थिती आज कापुस, गहु, चण्यासह तुरीच्या उभ्या पिकावर येऊन ठाकली आहे. पाऊस व ढगाळ वातावरणामुळे फुलगळ व किडीचा प्रादुर्भाव होऊ शकतो.याचा मोठा फटका शेतकऱ्याला बसणार असल्याचे दिसत असुन त्यामुळे मात्र उभे पीक पुन्हा हातुन जाणार ही भिती शेतकऱ्यांना सतावत असुन शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर नैराश्य दिसायला लागले आहे.

अशा वातावरणामुळे निर्माण झालेली कीड सुद्धा मोठा प्रश्न आहे.तर गळणारी फुले व कीड यावर कोणताही उपाय नसल्याने या समस्येला सामोर जायचे तरी कसे? पीक कसे वाचवावे याकरिता जगाच्या पोशिंद्याची धावपळ सुरू आहे.आधीच तालुक्यात दुष्काळग्रस्त परिस्थिती आणि त्यात पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे हाती येणाऱ्या पिकापासून मुकावे लागते की काय,अशा परिस्थितीत आज शेतकरी सापडला आहे.मारेगाव तालुक्यात 44424 हजार हेक्टर कृषी क्षेत्र आहे.त्यात 5 हजार 297 हेक्टर वर तुर पीक असुन ढगाळ वातावरणाने चांगलाच विपरीत परीणाम होत आहे.

तालुक्यातील शेत शिवारातील तूर या पिकावर शेंगापोखणाऱ्या,पिसारा पतंग आणि शेंगे माशीनी आक्रमण केल्याचे शेतकऱ्यांकडून सांगितले जात आहे.त्यामुळे तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाला असुन संकटाची मालीका शेतकऱ्यांची पाठ सोडत नसल्याने कपाशी,सोयाबीन,व आता तुर हातची जाणार त्यामुळे परत एकदा आर्थिक फटका बसणार असल्याची चर्चा सुरू आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर