ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

आदिवासी विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्रचे करण्यात आले वाटप….

81 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

# सहाय्यक जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या हस्ते आश्रम शाळा माथार्जून येते जात प्रमाणपत्राचे वाटप

तालुका प्रतिनीधी :-झरी (जामणी) ज्ञानेश्वर आवारी
( 88059 79173)

सविस्तर वृत्त असे की..lll
झरी जामणी येथे सहायक जिल्हाधिकारी तथा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय पांढरकवडा चे अधिकारी यांच्या पुढाकाराने झरी जामणी तालुक्यातील माथार्जुन येथील आश्रमशाळातील ४० आदिवासी विद्यार्थ्यांना गुरुवारी (ता. २४) एकाच दिवशी विनामूल्य जात प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.

आदिवासी विद्यार्थ्यांना वेळेवर शैक्षणिक कामासाठी जात प्रमाणपत्राची गरज भासते अशा वेळी त्यांच्याकडे आर्थिक व दळणवळण साधनांचा व ईतर बाबीचा अभाव त्यामुळे वेळेवर त्यांना जात प्रमाण पत्र मिळत नाही. यासर्व बाबीची जाणीव असलेले सहायक जिल्हाधिकारी तथा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प व उपविभागीय अधिकारी विवेक जॉन्सन यांनी पुढाकार घेऊन आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय पांढरकवडा अंतर्गत येणाऱ्या सर्व आश्रमशाळेत तसेच माथार्जुन येथील आश्रम शाळातील विद्यार्थ्यांना विनामूल्य जातीचे प्रमाणपत्र देण्याचा निर्धार केला.

त्या अनुषंगाने मुख्याध्यापक व तहसीलदार गिरीश जोशी यांचे सहकार्य घेऊन आश्रमशाळा माथार्जुन येथील मुख्याध्यापक, शिक्षक यांनी पालकांशी संपर्क साधून, घरोघरी जाऊन आवश्यक प्रमाणपत्र गोळा करून विशेष म्हणजे पालकांना कोणत्याही प्रकारचे शुल्क पालकांना भरावे लागले नाही. झेरॉक्स प्रती सुद्धा आश्रम शाळेकडूनच काढून दिल्या गेल्या. झरी जामणी तहसीलचे तहसीलदार गिरीश जोशी यांनी कर्मचाऱ्यांना विशेष आदेश देऊन अगदी कमी कालावधीत काम पूर्ण करून घेतले. तालुका प्रशासनाकडून जवळपास जातीचे ४० प्रस्ताव उपविभागीय अधिकारी विवेक जॉन्सन यांचे कार्यालयात दाखल केले. त्यानंतर उपविभागीय अधिकारी विवेक जॉन्सन यांनी ३ ते ४ दिवसात ४० जात प्रमाणपत्रे तयार केली. अत्यंत कमी कालावधीत पूर्णपणे मोफत जात प्रमाणपत्रे विद्यार्थ्यांना मिळाली याबद्दल पालक आणि विद्यार्थ्यां मध्ये आनंदाचे वातावरण असून, या परिसरात विशेष कौतुक होत आहे. या साठी प्रभारी मुख्याध्यापक सोनोने, शिक्षक नागोसे, क्रीडाशिक्षक साजीद शेख, संगणक शिक्षक भिवरकर, शिपाई मारोती सीडाम, चोकीदार महेश परचाके यांनी यांनी परिश्रम घेतले आहे…

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर