ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

पिककर्ज  वाटप वाटपाला विलंब

130 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

पावसाळ्याच्या तोंडावर  शेतकऱ्यांच्या  बॅकेत चकरा
पिककर्ज  वाटप वाटपाला विलंब

तालुका प्रतिनीधी :-झरी (जामणी) ज्ञानेश्वर आवारी
   [88059 79173]

झरी जामणी :- अर्धाअधिक मे महिना संपत आला तरी पीक कर्जाचे वाटप सुरू न झाल्याने पीककर्जाचे वाटप कधी होणार  याकडे शेतकऱ्याची लक्ष लागलेले आहे .दरवर्षीप्रमाणे यावर्षी शेतकऱ्यांनी 31 मार्च च्या आत पीक कर्जाची परतफेड केली आहे . दरवर्षी मार्च महिन्यात च वाटपाला सुरुवात होत होती .  परंतु यावर्षी  तालुक्‍यातील सर्वच कार्यकारी संस्थेच्या  निवडणुका पार पडल्या आहे .

अजून काही सोसायटी ची  अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीची प्रक्रिया पूर्ण व्हायची आहे.  या सर्व प्रक्रियेमध्ये पिककर्ज  वाटप  मागे पडले आहे . तालुक्यात  घडीला  आजच्या  २०% वाटप झाले नसल्याचे दिसून येत आहे .शेतीच्या  उन्हाळी मशागतीच्या    कामाला वेग आला असून  शेणखत  टाकणे , ट्रॅक्टरने नागरट , बांधा बंधीस्ती  सोबत अंडरग्राऊंड पाईप लाईन , तार कंपाऊंड , गोठा दुरुस्ती इ . कामे  पाऊस पडायच्या आत उरकावी लागले . या कामासाठी मजूर व  साहित्य खरेदीसाठी  नगदी पैशाची नितांत गरज असते .पांदण रस्त्याच्या अभावामुळे  पाऊस पडला की शेतात ट्रकटर   इ . वाहन किंवा  बैल गाडी घेऊन जाणे कठीण होऊन जाते .

त्यामुळे  अर्धे अधिक  शेतकरी  मे महिन्यातच शेतात रासायनिक खत वगैरे साठवून  ठेवतात . यावर्षी खताचे दर वाढल्याने खरेदीठी मोठी रक्कम मोजावी लागणार आहे.. पैशाअभावी ही कामे रखडली आहेत . अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी   जुळवाजुळव करून 31 मार्च   जुने पिककर्जाची  परतफेड करत असतो .  लवकरच कर्जाची रक्कम खात्यावर जमा होईल ही अपेक्षा होती .   परंतु निवडणूक आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्या या सगळ्यामुळे  पीककर्ज वाटप झाले नसल्याचे अनेक शेतकरी बँकेत  चकरा  मारताना दिसते आहे  .

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर