ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

अवैध गावठी हातभट्टीची दारू गाळणाऱ्या विरोधात कारवाई

139 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

यवतमाळ ग्रामीण पोलिसांची जांब येथे कारवाई

जांब येथील घनदाट जंगलामध्ये गावठी हातभट्टीची दारू गाळणाऱ्या ठिकाणी यवतमाळ पोलिसांनी धाड टाकली. यात तिघांना ताब्यात घेतले. तर 31 हजाराचा मुद्देमाल जप्त करून नष्ट करण्यात आला. सदर कारवाई दिनांक 23 डिसेंबर 2023 शनिवारला सकाळी करण्यात आली.

यवतमाळ पोलिसांना त्यांच्या गुप्तहेरांकडून माहिती मिळाली की, जांब परिसरातील जंगल भागामध्ये अवैधपणे हातभट्टीची दारू मोठ्याप्रमाणावर गाळली जात आहे. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक प्रकाश तुनकलवार यांच्या नेतृत्वाखाली अवैध रित्या दारू गाळणाऱ्या खरोला येथे यशस्वी मोहीम राबवून सदर मोहीम फत्ते करून दारू गाळणारे यांना घटनास्थळी रंगेहाथ पकडून त्यांचेजवळून गावठी हातभट्टीची दारू,दारूभट्टीचे साहित्य ताब्यात घेऊन कारवाई करण्यात आली.

या मध्ये संशयित आरोपी देविदास यशवंत शेडमाके रा जांब, यांचे जवळून 250 लिटर मोहामाच सडवा रसायन, लोखंडी ड्राम, जर्मन टोपले,असा एकूण 9000/- रू चा मूद्देमाल मिळाला. तर देविदास सर्यभान टेंभरे रा.खरोला.यांचे भट्टीवरील 350 लीटर मोहाचा सडवा रसायन, दारू गाळण्याचे साहित्य.असा एकूण 21000/-रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून शंकर नारायण सोनवणे, रा.जांब. यांचे दारूचे भट्टीवरुन 500लीटर मोहाचा सडवा रसायन .4 लोखंडी ड्राम व साहित्य असा एकूण 31000/- रू .चा मूद्देमाल जप्त व सर्व साहित्य तोडफोड करून जंगलात नाश करण्यात आले.

सदर कारवाई मा.पो.अधिक्षक डॉ.पवन बनसोड,अतिरिक्त पो.अधिक्षक पियुष जगताप, मा.उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुज्जलवार यांचे मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग कवरासे, पो.अंमलदार ज्ञानेश्वर मातकर, खूशाल राठोड, पोलिस उपनिरीक्षक प्रेमसींग चव्हाण,निलेश पातूरकर,संदिप मेहत्रे, सचिन पातकमवार,चालक पो.शी.अविनाश वाघाडे,पोलीस पाटील संजय घोडाम रा.जांब यांनी केली.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर