ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

दोन वर्षा आधी बंद झालेली बस सेवा सुरू करण्याची मागणी.

126 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

शिवणी (धोबे) येथील नागरिकांचे आमदार संजिवरेड्डी बोदकुरवार यांना दिले निवेदन

प्रसाद सुधाकरराव ढवस यांची मागणी.

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]

मारेगाव तालुक्यातील :-अखेर च्या टोकाला असलेल्या गाव शिवणी (धोबे) ते वणी येथे जाणारी बस सेवा हि गेल्या दोन वर्षापासून कोरोनाच्या महामारी पासुन बस सेवा बंद आहे.त्यामुळे काल दिनांक 13 मे 2022 रोज शुक्रवारला वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजिवरेड्डी बोदकुरवार यांना प्रसाद सुधाकरराव ढवस यांनी निवेदन दिले आहे.

कोरोनाच्या महामारी (कोविड-19)मुळे संपुर्ण देशातील शैक्षणीक क्षेत्रातील वेळापत्रकात झालेला बदला मुळे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुढे सरकवल्या गेल्या त्यामुळे विद्यार्थ्यांना व गावांतील वृद्धांना, नागरिकांना वणी येथे ये-जा करता कमालीचा बस अभावी त्रास सहन करावा लागत आहे.आणी परिसरातील लोकांना खासगी भाड्याच्या वाहणाचा मनमानी किराया नाइलाजास्तव देवुन वापर करावा लागत आहे.

हि बस सेवा लवकरात लवकर सुरु करण्यात यावी अशी मागणी होत आहे. व या भागातील मौजा शिवणी (धोबे) ते वणोजा (देवी) सुमारे अंतर 8.5 कि.मी या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात ओव्हर लोड ट्रकची वाहतुक होत असते त्या मुळे रस्त्यात मोठ-मोठे खड्डे पडलेले आहे. या मार्गाने ये- जा करणाऱ्या लोकांच्या मनात एकच विचार पळत आहे. “रस्त्यात खड्डे की रस्ता खड्यात..? व या मार्गाने प्रवास करणाऱ्या मोटारसायकल चालकांना कंबरेच्या दुखण्यामध्ये कमालीची वाढ झाल्याची माहिती गावकऱ्याकडून प्राप्त झाली आहे.

या गंभीर विषया कडे प्रशासनाने लक्ष द्यावे अशी मागणी प्रसाद सुधाकरराव ढवस भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा सचिव,आत्मा समिती अध्यक्ष मारेगाव तालुका.यांनी गावकऱ्यांच्या वतीने निवेदनातून केली
आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर