ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

वेगाव येथील 27 वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

148 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

सुरेश पाचभाई मारेगाव,

मारेगाव तालुक्यात आत्महत्या रोखण्यासाठी प्रशासना कडून ठोस उपाय योजना केल्या जात नाही.तालुक्यात आत्महत्या थांबण्याचे नाव घेत नाही.वेगाव येथील एका 27 वर्षीय युवकाने पळसाच्या झाडाला दोराच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दिनांक 8 जुलै 2024 रोज सोमवारला सायंकाळी 6.30 वाजताच्या सुमारास घटना उघडकीस आली.

सविस्तर वृत्त असे की..
सतीश दिलीप मेश्राम वय सुमारे 27 वर्ष रा.वेगाव ता.मारेगाव असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव असुन तो शेत मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा.बातमी लीहिपर्यंत आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही.

सतीश यांनी आज घरी संडासला जातो असे सांगून ते वेगाव हेटी लगत एका शेतकऱ्याच्या शेतात गेले. तिथे पळसाच्या झाडाला दोराच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केल्याचे कुटुंबियांच्या निदर्शनास आले.त्यांनी या घटनेची माहिती लगेच मारेगाव पोलिसांना दिली माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

पंचनामा करुन शव उत्तरीय तपासणी साठी मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहे.मृतक शेतकरी सतीश यांचे पश्चात आई,वडिल,पत्नी, दोन मुली असा आप्त परिवार आहे.या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार शंकर पांचाळ यांचे मार्गर्शनाखाली जमदार अफजल पठाण करीत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर