ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: ‘ऑक्टोबर हिट’मुळे रेल्वेचा खोळंबा, मुंबईत रुळांच्या प्रसरणाने प्रवाशांचे हाल, काय घडतंय? ✦ ⚡ वन्यजीव संरक्षणाचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत! ✦ ⚡ कोल्हापुरात भरदिवसा गोळीबार, एकाचा खून, पित्रा-पुत्रासह तिघांना जन्मठेप, काय घडलं? ✦ ⚡ Pune Video:पुण्यातील MPSCविद्यार्थ्यांना पोलिसांकडून नोटीस, २९ क्लास, अभ्यासिका चालकांनाही नोटिसा ✦ ⚡ लिलाबाई बापूराव कुचनकर यांचे निधन ✦ ⚡ चारा संपला, पाणीही नाही प्यायला, जिवापाड जपलेल्या मुक्या जिवाला अर्ध्या किंमतीत विकायची वेळ, बीडमधलं भीषण व… ✦ ⚡ ‘आई मला वाचव’ तरुणाचा व्हॉट्सॲपवर मेसेज अन् घडलं भयंकर, पंढरपूरमधील त्या घटनेने एकच खळबळ ✦ ⚡ Eknath Shinde Amit Shah: दिल्लीत खलबतं, महाराष्ट्रात टेन्शन! एकनाथ शिंदेंचा अचानक दिल्ली दौरा; अमित शाहांसो… ✦ ⚡ Instagram वर मैत्री, लिव इन रिलेशनशीपमध्ये असताना मृत्यू, कल्याणच्या मुलीसोबत छत्तीसगडमध्ये काय घडलं? ✦ ⚡ दिनेश धोंडूजी वैद्य यांच्या ३० वर्षांच्या ज्ञानयज्ञाची सांगता
SP News Maregaon

मारेगावात महाआरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

707 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

१,०१८ नागरिकांची तपासणी, ३०२ रुग्ण रेफर

सुरेश पाचभाई मारेगाव

मारेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आयोजित करण्यात आलेल्या महाआरोग्य शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सकाळपासूनच शिबिरस्थळी नागरिकांची अलोट गर्दी झाली होती.

दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था, सावंगी (मेघे) तथा आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय, सावंगी (मेघे) यांच्या संयुक्त विद्यमाने आणि शिवसेना (उबाठा) तालुका शाखा मारेगावच्या पुढाकाराने हे शिबिर घेण्यात आले. शिबिरात तब्बल १,०१८ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली, तर ३०२ रुग्णांना पुढील उपचारासाठी रेफर करण्यात आले.

या महाआरोग्य शिबिरात विविध आजारांची मोफत तपासणी, वैद्यकीय मार्गदर्शन व उपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. विशेषतः डोळ्यांच्या आजारांची तपासणी करून मोतीबिंदू शस्त्रक्रिया, तिरळेपणा आदी आजारांवर पुढील उपचारासाठी मार्गदर्शन करण्यात आले.

रक्तदाब, मधुमेह, किडनीचे आजार, हृदयरोग, अशक्तपणा, वारंवार चक्कर येणे, हायड्रोसिल, हर्निया, अंगावरील गाठी, आतड्यांचे आजार, मुतखडा, पोटाचे विकार, गलगंड, थायरॉईड, कान-नाक-घसा विकार, ऐकू न येणे, कानातून पाणी येणे, संधिवात, हाडांचे आजार, दमा, दातांचे विविध आजार तसेच महिलांच्या विविध आजारांचीही तपासणी करण्यात आली.

शिबिरात आलेल्या रुग्णांची आवश्यक तपासणी करून त्यांच्या आजाराबाबत वैद्यकीय तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. गंभीर अथवा पुढील उपचारांची गरज असलेल्या रुग्णांना योग्य उपचारासाठी रेफर करण्यात आले. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा आरोग्य दिलासा मिळाला.

शिबिरस्थळी नागरिकांची ये-जा सुरळीत राहावी, तसेच रुग्णांना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी शिवसेना (उबाठा) तालुका शाखेच्या वतीने विशेष व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी आशा वर्कर महिलांना पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करण्यात आले. आरोग्यसेवा थेट नागरिकांच्या दारापर्यंत पोहोचविणाऱ्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.

शिवसेना (उबाठा) जिल्हाध्यक्ष संजय निखाडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाचे उद्घाटन वणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजयभाऊ देरकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तहसीलदार उत्तमराव निलावाड, गटविकास अधिकारी भीमराव व्हनखडे, किरणताई देरकर, नगराध्यक्ष डॉ. मनीष मस्की, विधानसभा प्रमुख सुनील कातकडे, उपजिल्हाप्रमुख ठाकरे, मधुकर वरटकर,

तालुकाप्रमुख पुरुषोत्तम बुटे, करण किंगरे, नगरसेविका वर्षाताई किंगरे, मालाताई बदकी, जितेंद्र नगराळे, यवतमाळ जिल्हा संघटिका डिमणताई टोंगे, यवतमाळ जिल्हा समन्वयक सुधीर थेरे, जिल्हा शरद प्रमुख संघटक गणपत लेडांगे, संतोष माहुरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

शिबिराच्या यशस्वीतेसाठी दिवाकर सातपुते, अभय चौधरी, मुरलीधर उमाटे, बदरुद्दीन काजी, अतुल मस्की, सुभाष बदकी, सचिन पचारे यांच्यासह शिवसैनिकांनी अथक परिश्रम घेतले.
मोफत आणि सर्वसमावेशक आरोग्य तपासणीची सुविधा एकाच छताखाली उपलब्ध झाल्याने मारेगाव परिसरातील नागरिकांसाठी हे महाआरोग्य शिबिर विशेष उपयुक्त ठरले.

१,०१८ तपासण्या आणि ३०२ रेफर रुग्णांची नोंद झाल्याने शिबिराला मिळालेला प्रतिसाद त्याच्या व्यापक परिणामाची साक्ष देणारा ठरला.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर