ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

मारेगाव मैत्री कट्टा ग्रुपच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन

666 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

निमित्त जागतिक महिला दिन तथा डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव

प्रमोद रा.मेश्राम मारेगाव

समता, स्वातंत्र्य, बंधुता व सर्वांना न्याय मिळवून देणारे, सामाजिक क्रांती घडवून देशाची शान उंचावणाऱ्या महापुरुषांच्या शौर्याची माहिती बहुजनांना मिळावी ह्या उद्देशाने प्रेरित होऊन बहुजन उद्धारक, कायदेतज्ज्ञ, प्रज्ञासूर्य, भारतीय संविधानाचे शिल्पकार, विश्वरत्न, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती महोत्सव तथा जागतिक महिला दिन दि. 12 एप्रिल 2025 पासून साजरा करण्यात येत आहेत.

विदर्भस्तरीय पारंपरिक वेशभूषा स्पर्धा (Traditional dress competition) वेगवेगळ्या राज्यांमध्ये आणि देशांमध्ये विविध प्रकारचे पारंपरिक कपडे आहेत,जे गेल्या हजारो वर्षांपासून स्थानिक लोक परिधान करतात. पारंपरिक वेषप्रणाली ही एक प्रकारची परंपरा आहे. आपली परंपरा जोपासली जावी या उदात्त हेतूने 18 वर्षांवरील महिलांसाठी’ पारंपरिक वेशभूषा’ स्पर्धेचे आयोजन केले आहे.
स्थळ:शेतकरी सुविधा केंद्र मारेगाव दि.12 एप्रिल 2025 सकाळी 10 वाजता

प्रवेश फी 100 रुपये,प्रथम बक्षीस 5000/-,व्दितीय बक्षीस 3000/-,तृतीय बक्षीस 2000/,विदर्भस्तरीय नृत्यस्पर्धा
12 एप्रिल सायंकाळी 5 वाजता 30 वर्षा वरील वयोगटाच्या महिलाकरीता नृत्यस्पर्धे चे आयोजन करण्यात आले आहे.

वसंत जिनिंगच्या पटांगणात होणारी ही नृत्य स्पर्धा समूह नृत्य व एकल नृत्य अशा दोन प्रकारे घेण्यात येणार आहे.समूह नृत्याला
प्रथम 11000/- ,द्वितीय 9000/-, तृतीय 7000 रोख, तर एकल नृत्याला प्रथम 7000 /-,द्वितीय 5000 /-,तृतिय 3000 /-रोख आणि चषक देण्यात येणार आहे .

प्रवेश फी समूह नृत्यासाठी 500 तर एकल नृत्यासाठी 250 रूपये राहील.भव्य सांस्कृतीक महिला रैली दिनांक 13एप्रिल रविवारी सायंकाळी 4 वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकातुन रैली प्रारंभ होऊन शहरात मार्गक्रमण करीत परत येईल.रॅली मध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महाड येथील चवदार तळ्याच्या सत्याग्रहाचे दृश्य  दाखविणारा देखावा सादर केला जाणार आहे.

तसेच ढोल ताशाच्या गजरात विविध नृत्य व आदिवासी दंडार नृत्य सादर केले ‌जाणार आहे. प्रवेशासाठी सौ .प्रतिभा डाखरे 9922669648,सौ.बीना दुपारे हेपट 9356035463 सौ.मयुरी जैस्वाल 7066006684 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन  मारेगावं मैत्री कट्टा ग्रुपच्या  वतीने कार्यक्रमाचे संयोजक दीपक जूनेजा यांनी केले आहे.कार्यक्रमाच्या आयोजनासाठी सौ.बिना हेपट (दुपारे), सौ.प्रतिभा डाखरे ,उदयभाऊ रायपुरे, गणेश पावशरे ,किशोर पाटील ,गजानन जयस्वाल,शहाबुद्दीन अजानी आदी सदस्य अथक परिश्रम घेत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर