ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

मारेगावात  शिवसेनेचे  ” चक्का जाम” आंदोलन.

107 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

– वाहनाच्या लांबच लांब रांगा

– वाहतुक विस्कळीत

– सुरेश पाचभाई मारेगाव,

मारेगाव :- कोसारा  रेती घाटाची सखोल चौकशी करून शासनाचा महसूल बुडवणाऱ्या दोषी तहसीलदार व महसूल अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी या मागण्या घेऊन काल दि.6 फेब्रुवारी 2024 रोजी शिवसेनेच्या वतीने  डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक मारेगाव येथे दुपारी २ वा. ” चक्का जाम आंदोलन ” करण्यात आले.

तालुक्यात  एकमेव असलेल्या कोसारा डेपो मधून रेती उपसा करण्यात आला. मात्र, तालुक्यातील लाभार्थ्यांना  रेती मिळन्यास भरपूर अडचणी येत आहेत.तालुक्यातील लाभार्थ्यांना रेती मिळावी.रेती मिळत नसल्यामुळे  गवंडी कामगार, मजूर, बिल्डिंग मटेरियल व्यांवसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे.
तसेच घरकुल लाभार्थी वाळूसाठी वणवण फिरत असताना मात्र, प्रशासन नुसतीच  बघ्याची भूमिका घेत होते.

त्यामुळे कोसारा रेती घाटाची सखोल चौकशी करुन तहसिलदार व महसुल अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी शिवसेना (शिंदे गट) यांच्यातर्फे १९ जानेवारी रोजी पत्रकार परिषद घेत तालुका प्रमुख विशाल किन्हेकार यांनी केली होती.
याबाबत चौकशी व कारवाई केली नाही तर मारेगावात चक्का जाम आंदोलन करण्यात येइल असा थेट ईशाराही देण्यात आला होता. मात्र   प्रजासत्ताक दिनाचा सन्मान ठेवत दि.२६ जानेवारीला होणारे “चक्का जाम आंदोलन” स्थगित करण्यात आले होते.

मात्र आजपावेतो प्रशासनास दिलेल्या मागणी निवेदनावर कुठलीही ठोस कार्यावाही झाली नसल्याने काल दि .६ फेब्रु. रोज मंगळवारला डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे  दुपारी २ वा. ” चक्का जाम आंदोलन ” करण्यात आले.या आंदोलनामध्ये  शिवसेना तालुका प्रमुख विशाल किन्हेकार यांचे नेतृत्वात  विजय मेश्राम,सुरेश लांडे,अमोल मत्ते,राजू खडसे, धिमा जाधव, प्रवीण विकनकर, भोजराज मस्की, प्रशांत वंनारी, हरीश परचाके, जीवन वैद्य,राजू ठक, उमेश उलमाले यांचे सह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर