ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

दांडगाव येथील 60 वर्षीय व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या

95 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

सुरेश पाचभाई मारेगाव,

मारेगाव तालुक्यात आत्महत्या रोखण्यासाठी प्रशासना कडून ठोस उपाय योजना केल्या जात नाही.तालुक्यात आत्महत्या थांबण्याचे नाव घेत नाही.दांडगाव येथील एका 60 वर्षीय व्यक्तिने निंबाच्या झाडाला धोत्राराच्या साह्याने सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दिनांक 16 व 17ऑगस्टच्या मध्यरात्रीच्या सुमारास घटना उघडकीस आली.

सविस्तर वृत्त असे की..
पैकाजी शंकर बावणे वय सुमारे 60 वर्ष रा.दांडगाव ता.मारेगाव असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव असुन तो रोजमजुरी करुण आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा.त्यांना कॅन्सरच्या आजाराने ग्रासले होते.त्याचेवर नागपुर येथिल एका दवाखान्यात उपचार सुरू होते.कॅन्सरच्या आजाराला कंटाळुन आत्महत्या केली असावी असा कयास लावला जात आहे.बातमी लीहिपर्यंत आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही.

पैकाजी यांनी काल रात्रीच्या सुमारास घरी संडासला जातो असे सांगून ते दांडगाव गावातुन नदीकडे जाना-या रस्त्यावर असलेल्या निंबाच्या झाडाला धोत्राच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केल्याचे
काही नागरिकांच्या निदर्शनास आले.

त्यांनी या घटनेची माहिती लगेच मारेगाव पोलिसांना दिली माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.घटनास्थळ पंचनामा करुन शव उत्तरीय तपासणी साठी मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहे.मृतक रोजमजुर पैकाजी यांचे पश्चात पत्नी, दोन मुले असा आप्त परिवार आहे.या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार शंकर पांचाळ यांचे मार्गर्शनाखाली भालचंद्र मांडवकर, सागर दिपेवार,करीत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर