ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

खुल्या बाजारात जाणारे रास्त भाव दुकानातील धान्य
गावकऱ्यांनी पकडले.

80 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

रास्त भाव दुकानाचा परवाना रद्द करण्याची मागणी.

मोफत धान्य वाटप केले नाही असा गावकऱ्यांचा आरोप

तालुका प्रतिनीधी :-झरी (जामणी) ज्ञानेश्वर आवारी
   [88059 79173]

झरी (जामणी )तालुक्यातील दुर्गापूर येथील रास्त भाव दुकानदार सतीश भालेराव यांच्या गोदामातून खुल्या बाजारपेठेत विक्रीसाठी जाणारे धान्य ग्रामस्थांनी रात्री अकराच्या दरम्यान पकडले या गोदामातून सुरदापुर येथील महिंद्रा पिकप गाडी मधून हे धान्य येत असल्याचे आढळले ,ग्रामस्थांनी ही गाडी थांबवून चौकशी केली असता वाहन चालक राकेश राम रेड्डी अल्लूरवार यांनी प्रथम माहिती देण्यास टाळाटाळ केली.

गावातील नागरिकांनी आक्रमक होऊन तहसीलदारांना मोबाईल द्वारे माहिती दिली.त्यावरून तहसीलदार गिरीश जोशी आणि श्री मोरे आणि महसूल चे कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन महिंद्रा पिकप मधील धान्याचा पंचनामा करून पोलीस स्टेशन पाटण येथे सदर वाहन लावण्यात आले,पंचनामा करून संबंधितावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहे , बातमी लिहे परियंत दुकानदारावर कारवाई करण्यात आलेली नाही,

दुर्गापूर येथील गावकऱ्यांनी मोफत धान्य आम्हाला मिळाले नाही त्यामुळे मोफत धान्य गेले कुठे यापूर्वी असे धान्य देण्यात आले की काय असा प्रश्न गावकर्यां समोर पडला आहे. तेव्हाच सदर घटनेची सखोल चौकशी करून रास्त भाव दुकानदार परवाना रद्द करण्याची मागणी जोर पकडत आहे.

हे धान्य पकडून देण्यामध्ये दक्षता समितीचे अध्यक्ष प्रवीण लेनगुळे, रवी नखाते, सुभाष नखाते, कैलास अक्कलवार, पोपेशवर गवळी ,निखिल वनकर, निखिल नगराळे सुनिता नखाते ,दया कर भोंग, यासह मोठ्या प्रमाणातील गावकऱ्यांनी पुढाकार घेतला होता

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर