ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

पंधरा दिवसात सहा रेती तस्करावर कारवाई

80 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

सध्या झरीला लाभले तहसीलदार राजेश वैष्णव यांना निवडणुकी पुरते न ठेवता,कायमस्वरूपी ठेवण्याची मागणी

ज्ञानेश्वर आवारी:-उपसंपादक झरी जामणी

झरी तालुका हा आदिवासीबहुल तालुका म्हणून प्रचलित असून या तालुक्यातील तहसील कार्यालचा कारभार हा विशेषतः प्रभारी पदावरच असून या तहसील कार्यालयामध्ये कायमस्वरूपी तहसीलदार मिळावे यासाठी तालुक्यातून मागणी होत आहे .

मागील वर्षी तहसीलदार  गिरीश जोशी यांची बदली झाल्यानंतर त्यांचे तहसीलदार हे पद रिक्त होते व प्रभारी तहसीलदार म्हणून  महेश रामगुंडे यांनी कार्यभार सांभाळला त्यांची बदली मारेगाव येथे झाल्याने येथे पुन्हा तहसीलदार हे पद रिक्त झाले.त्यामुळे निवडणुकीपुरते  राजेश वैष्णव यांची तहसीलदार पदी नियुक्ती झाली असून या निवडणुक झाल्यानंतर तालुक्यात अवैद्य रेती तस्कर मोठ्या प्रमाणात असल्याचे लक्षात आल्याने रेती तस्करावर कार्यवाही करण्यासाठी चार पथके नेमून दिले असून सदर पथके कार्यवाही सज्ज असल्याचे दिसून येत आहे.

परंतु रेती तस्करांचे हेर प्रत्येक घाटावर असल्याने तस्करावर कार्यवाही करताना मोठी अडचण होत असून सुद्धा तालुक्यातील  दुर्भा घाटावर तहसीलदार राजेश वैष्णव यांचे मार्गदर्शनानुसार व नायब तहसीलदार राजेंद्र मसराम यांच्या सहकार्याने ३ रेती भरलेले ट्रॅक्टर पकडण्यात आले असून या पंधरा दिवसांमध्ये तालुक्यात ६ रेती तस्करावर कार्यवाही करण्यात आली आहे या पथकात वाहन चालक वसंता मडावी तलाठी राजू मोरे व तलाठी बाला गायकवाड यांनी कार्यवाही करून पोलीस स्टेशन पाटण यांचे कडे रेती भरलेले ट्रॅक्टर सुपूर्त केले आहे.तहसीलदार राजेश वैष्णव यांचे कार्य चांगले असल्याने कायमस्वरूपी तहसीलदार म्हणून झरी येथेच ठेवण्यात यावे अशी मागणी तालुक्यातून होत आहे .

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर