ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

आसान्या फाउंडेशन द्वारा बुद्ध जयंती निमित्त भव्य खिरदान कार्यक्रमाचे आयोजन

154 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

यवतमाळ प्रतिनिधी

‘अंधार नष्ट करावयाचा असेल तर स्वतःमध्ये असलेल्या उजेडालाच आवाहन आणि आव्हान करावे लागेल त्यालाच आपण अत्त दीप भव असे म्हणतो’. जगाला शांती संयम, सत्य आणि अहिंसेचा अनमोल संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या 2568 व्या जयंतीनिमित्त वैशाखी बुद्ध पौर्णिमेच्या मंगलदिनी आसान्या फाउंडेशन व असोसिएशन ऑफ प्रोग्रेसिव्ह एम्प्लॉईज इंडिया एपीईआई यवतमाळच्या वतीने संविधान चौक यवतमाळ येथे भव्य खिरदान वाटप कार्यक्रम करण्यात आला.

सर्वप्रथम महाकारूणीक तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध यांच्या मूर्तीजवळ मेणबत्ती प्रज्वलन  आणि पंचांग प्रणाम करून भव्य खिरदान वाटपाला सुरुवात झाली या कार्यक्रमातून दुहेरी उद्देश साध्य करण्याचा प्रयत्न करण्यात आला यामध्ये निसर्ग संवर्धन आणि पर्यावरण संरक्षण तसेच प्लास्टिकचा कमीत कमी वापर करण्याचा मौलिक संदेश फलकांवर लिहिलेल्या  सुविचारांच्या माध्यमातून देण्यात आला.

आसान्या फाउंडेशन चा लोगो असलेली रांगोळी नयन पाटील यांनी काढली. कार्यक्रमाला डॉक्टर किशोर बनसोड आणि माननीय सुनील मालके यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले ,यावेळी उपस्थित मान्यवरांमधे माननीय भीमराव घनमोडे, बनसोड साहेब बनसोड मॅडम, डॉ. निलेश उके, वनपरिक्षेत्र अधिकारी सुहास कांबळे, धीरज भाऊ वाणी, स्मिताताई उके, माधुरी ताई वाळके,



डॉ.स्नेहल दिघाडे डॉ.निकिता, चैताली सुमेध भिमटे कल्पनाताई घनमोडे डॉ. उत्कर्ष मोहोड, नितेश मेश्राम, अमोल मेश्राम, अमित पाटील ,संदीप भुरके ,चेतन नेवारे, विजय देवकते, चिराग पाटील सक्षम भिमटे, राजकुमार सुखदेवे सुनील मानवटकर, निखिल बनसोड , रेश्मा ठोमणे, श्रेया गजभिये, सिमरन ठमके ,रवीना सवाईकर यांनी पुढाकार घेतला. श्री नितीन पाटील व मृणालिनी दहीकर  यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अथक परिश्रम घेऊन, कार्यक्रमाचे यशस्वीरित्या आयोजन, नियोजन  केले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर