ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

झरीचा शिक्षण विभागाचा कारभार प्रभारावर

104 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

९ शाळा शिक्षकांविनाच,गटशिक्षणाधिकारी सह १० केंद्रप्रमुख प्रभारी

१२२ शिक्षकांची पद रिक्त

ज्ञानेश्वर आवारी झरी जामणी

१ जुलै रोजी जिल्ह्यातील सर्व शाळा सुरू झाल्या आहेत.शहरी भागात हे चित्र वेगळे तरी मात्र खेड्यातील शाळा फक्त नावालाच सुरू असल्याचा वास्तव चित्र पहायला मिळते.सरकाने प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचे केले असले तरी आजही तळागळातील बालकांना शिक्षण घेण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे.

खाजगी व इंग्रजी माध्यमाच्या शाळां कडून सुविधांच्या नावाखाली वारेमाप फी उखडली जात असून गरिब शेतकरी,शेतमजूर व सर्वसामान्यांना ते आवाक्याबाहेर आहे तर दुसरीकडे  मोफत शिक्षण देणारा जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकवणारे शिक्षकच नाही . आपल्या मुलांना कुठे शिकवावे अशा द्वीधा मनस्थितीपालक आहे.

शाळा सुर झाल्या आपल्या लेकरांना चांगले शिक्षण मिळावे या हेतूने  पालकांनी आपल्या मुलांना शाळेत दखल केले.शाळा सुरू होवून दोन आठवडे झाले असले तरी झरी तालुक्यातील ९ शाळांना शिक्षण नसल्याने विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे.दोन शिक्षकी शाळांना पाच वर्गाला एकच शिक्षक सांभाळताना दिसतात तर वर्गखोल्या अभावी एकाच खोलीत सर्व वर्ग भरविले जात आहे.

तालुक्यात एकूण १४९ प्राथमिक शाळांमध्ये १० हजार ८५० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.त्यापैकी जिल्हा परिषदेच्या शाळा ११६  तर १ जिल्हा परिषद हायस्कूल आहे.या सर्व विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी  ३४६ शिक्षकांची गरज आहे.परंतु बदल्या आणि सेवानिवृत्ती यामुळे असून १२२ शिकांची पद रिक्त असून केवळ २२४ शिक्षक सध्या कार्यरत आहेत.धक्कादायक बाब म्हणजे ९ शाळांना शिक्षक नसून  अनेक शाळांना शिक्षक आवश्यक असल्याने शिक्षकाची मागणी पालक व गावकरी करत आहेत.

गेल्यावर्षी आक्टोंबर पर्यंत नविन शिक्षक भर्ती  झाली की शिक्षक मिळेल असे आश्वासान देण्यात आले.तात्पुरती तडजोड म्हणून सहा महिन्या करिता गावाती सुशिक्षित बेरोजगार युवक युवतीं ची स्वयंसेक म्हणू नियुक्ती करण्यात आली.एकूण ६० स्वयंसेवी नियुक्ती करण्यात आली होती.परंतु दोन महिन्या चे मानधन असूनही मिळाले नाही . यावर्षी ७२ स्वयं सेवकांची गरज असल्याची माहिती मिळाली आहे.

       भौतिक सुविधांचा अभाव
एकीकडे लाखो खर्च रुपये खर्च डीजिटल वर्ग खोल्यांचा गाजावाजा करण्यात आला.दोन चार महिन्यात डिजिटल यंत्रणा बंद पडल्या तर कुठे शिकविणारे शिक्षक नसल्याने ही यंत्राना धुळ खात आहेत .  जवळपास १० शाळांना विद्यार्थ्यांना बसण्यासाठी वर्ग खोल्या नाहीत . ७२ शाळा मध्ये मोठी दुरुस्ती करणे आवश्यक आहे.इमारती ना भेगा पडल्या तर कुठे फरसी नाही तर काही इमारतींचे छत गळतत आहेत अशा प्रकारची दुरुस्ती न झाल्याने सर्व वर्ग एकाच ठिकाणी बसविण्यात येत आहे.२६ शाळांमध्ये मुलासाठी तर ३४ शाळांना मुली करिता स्वच्छता गृह नाही.तर काही ठिकाणी दोन वर्षा पासून शौचालयाचे बांधकाम अर्धवट आहे.केवळ साठ टक्के विद्यार्थ्यांना शालेय पाठ्यपुस्तकात मिळाले असून शाळा सुरू होवूनही गणवेश मिळाला नाही.

प्रतिक्रिया..
“पंचायत समितीअंतर्गत शाळेमध्ये कार्यरत असेले ९ शिक्षक   सेवानिवृत्त झाले असून नवीन शिक्षक मिळाले नाहीत त्यामुळे इतर शाळेतील शिक्षकांकडे त्याशाळांचा तात्पुरता प्रभार देण्यात आला आहे.१२२ शिक्षकांची  पद रिक्त आहे .अनेक गावातील पालकांनी शिक्षकांची मागणी करत आहेत.पण तू त्यांना शिक्षक कुठून द्यावे हा प्रश्न आहे.अधिकारी म्हणून जनतेला न्याय देणे कठीण आहे .”

अर्जून मडुमवार
प्रभारी गटशिक्षण अधिकारी
पंचायत समिती झरी जामणी.


    
              

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर