ब्रेकिंग न्यूज
Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian … Tukaram Mundhe : एफडीएमध्ये आधी काय सुरू होतं? तुकाराम मुंढेंनी मनापासून सगळं सांगितलं; म्हणाले, “माझ्याआधी… मोबाईल बाजूला ठेवायला लावला, कामाच्या ठिकाणी महिलेला मागील खोलीत बोलावले अन्…, छत्रपती संभाजीनगरमधील धक्क… Mumbai Local: गणपती विसर्जनासाठी मध्य रेल्वे सज्ज, मुंबईत 22 विशेष लोकल चालवणार, संपूर्ण वेळापत्रक
SP News Maregaon

दिव्यांगांसाठी कृत्रिम अवयव शिबिर : शिवसेनेचा सामाजिक उपक्रम

3 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

खासदार संजय देशमुख यांच्या अभिष्टचिंतनानिमित्त वणी विधानसभा क्षेत्रात भव्य मोफत सेवा शिबिर

सुरेश पाचभाई | मारेगाव

वणी विधानसभा क्षेत्रातील दिव्यांग बांधवांसाठी शिवसेनेच्या वतीने खासदार संजय देशमुख यांच्या अभिष्टचिंतनानिमित्त भव्य मोफत कृत्रिम अवयव व विशेष सेवा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सामाजिक बांधिलकी जपत दिव्यांगांच्या जीवनात नवी आशा निर्माण करणाऱ्या या उपक्रमामुळे परिसरातील गरजू नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या विशेष शिबिरात ४० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक दिव्यांग असलेल्या व्यक्तींना ऑन-द-स्पॉट कृत्रिम हात-पाय बसविणे, कॅलिपर्सचे मोजमाप घेणे तसेच तत्काळ वितरण करण्यात येणार आहे. त्यामुळे दिव्यांगांना मोठा दिलासा मिळणार असून, त्यांच्या दैनंदिन जीवनाला नवी उभारी मिळणार आहे.शिबिरासाठी आधार कार्ड, रेशन कार्ड, स्वतःचा फोटो आणि वैद्यकीय प्रमाणपत्र (UDID कार्ड) आवश्यक राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.

शिबिराचे आयोजन पुढीलप्रमाणे करण्यात आले आहे —

🔹

 २० मे २०२६ – मारेगाव येथील एकविरा बँकेत

🔹

 २१ मे २०२६ – झरी जामणी येथे बजरंगबली मंदिरासमोर

🔹

 २२ मे २०२६ – वणी येथील नंदेश्वर देवस्थान येथे
शिबिराची वेळ सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत राहणार आहे.

या उपक्रमासाठी वणी ग्रामीण, वणी शहर, झरी जामणी आणि मारेगाव येथील शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते परिश्रम घेत असून, जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांनी या मोफत शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

संपर्कासाठी :वणी ग्रामीण : संतोष कुचणकर – 9403488873, महेश सोमलकर – 9823282344,वणी शहर : विनोद ढुमने – 9881227792, तुलसी तेवर – 8883333733,झरी जामणी : सतीश आदेवार – 9822742460, मंगेश मोहितकर – 9356350576, नेताजी पारखी – 8975279394
मारेगाव : पुरुषोत्तम बुट्टे – 9822151563, अभय चौधरी – 9423613603, अमोल झोटिंग – 9518985626

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर