ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

जय श्रीरामच्या गजराने दुमदुमणार मारेगाव नगरी

825 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

भव्य शोभयात्रेचे आयोजन; शहरवासीयांनी जपली परंपरा

श्री.राम नवमी उत्सव समिती व बजरंग दल मारेगाव यांचे आयोजन

सुरेश पाचभाई मारेगाव,

मारेगाव येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही दिनांक 5 एप्रिल 2025 रोज शनिवारला सायंकाळी 5 वाजता भव्य मोटर सायकल रॅली नगर पंचायत मारेगाव येथून सुरुवात होईल तर दिनांक 6 एप्रिल 2025 रोज रविवारला सकाळी 9 वाजता.मूर्ती पूजन आणी दुपारी 2 ते 5 महाप्रसाद वाटप कार्यक्रमचे आयोजण करण्यात आले आहे .

आणि सायंकाळी 5 वाजता प्रभू श्रीराम नवमी उत्सव शोभायात्रा समितीतर्फे भव्य दिव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात येत आहे.अनेक वर्षांपासून मारेगावमध्ये ही परंपरा कायम आहे. प्रभू श्रीरामांच्या जन्मोत्सवानिमित्त मारेगाव येथे रामरथाचे आयोजन करून भव्यदिव्य शोभायात्रा शहरातुन काढण्यात येणार आहे.

या शोभायात्रेमध्ये विविध देखावे असणार आहेत. प्रभु श्री.रामाची देखणी मूर्ती,आणि हनुमान यांच्या मूर्ती विशेष आकर्षण ठरणार आहेत. तसेच, मारेगाव शहराला रामस्थ,या शिवाय,रामपालखी,  विविध बँड पथके अशा विविध पालख्यांसह ही शोभायात्रा निघणार आहे.
दिनांक 6 एप्रिल 2025 रोजी संपूर्ण मारेगाव नगरी भगवामय होईल.नगर पंचायत जवळील हनुमान मंदिर येथे संध्याकाळी 5 वाजता प्रभू श्रीरामांच्या रामरथाचे पूजन करून शोभायात्रेला सुरुवात होईल.

या मार्गाने निघणार शोभायात्रा..
■ ही शोभायात्रा हनुमान मंदिर नगर पंचायत मारेगाव येथून सुरू होऊन मार्डी चौक,स्टेट बँक मार्ग, राष्ट्रीय विद्यालय, बस स्थान चौक ,डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, बाळासाहेब चौक,मार्गे पुन्हा हनुमान मंदिर येथे पोहोचेल आणि महाआरतीने समारोप होईल.या शोभायात्रेत मोठ्या संख्येने रामभक्तांनी सहभाग घ्यावा,अशी विनंती श्री.राम नवमी उत्सव समिती व बजरंग दल मारेगाव यांनी केले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर