ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

अहेरअल्ली जवळील तो अरुंद बोगदा ठरताहेत अपघातप्रवण स्थळ.

125 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

सदोष रस्ता तयार करण्यासाठी सरपंच संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन.

तालुका प्रतिनीधी :-झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी
[88059 79173]

झरी जामणी तालुक्यातील अहेर अल्ली येथील रेल्वे पूला खालून जाणाऱ्या बोगद्यामुळे अनेक अपघात होत आहे.पावसाळ्यात पाणी व चिखल साचत असल्याने लोकांना तसेच शाळकरी मुलांना शाळेत जाणे त्रासदायक ठरत आहे.तसेच रेल्वे पूला खालून येणारे व जाणारे दोन्ही बाजूकडील वाहन जावे अशी व्यवस्था रेल्वे प्रशासनाने दुसरा पूल उभारून करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

अहेर अल्ली येथील रेल्वे पूला खालूल जाणारा रेल्वे बोगदा एकदम अरुंद खोलगट तिरकस असल्यामुळे दोन्ही बाजूने येणारे लहान मोठे वाहने एकमेकांना दिसत नाही.राष्ट्रीय मार्ग क्र. ७ जोडण्यात आल्याने येथे मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते.११ नोव्हेंबर रोजी धानोरा येथील रामदास तुडमवार नामक इसमाचा याच पुलाखाली बसच्या धडकेत मृत्यू झाला. त्यामुळे अपघातात मृत्यू झालेल्या तुडमवार यांच्या कुंटुबीयांना रेल्वे प्रशासनाने आर्थिक मदत द्यावी.

त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला रेल्वेमध्ये नोकरी द्यावी.अहेर अल्लीचे सरपंच यांनी या पुलाबाबत रेल्वे प्रशासनाकडे तक्रार करून ही कारवाई करण्यात न आल्याने रेल्वे प्रशासनाविरोधात सरपंच संघटना सह ग्रामवासीयांत प्रचंड रोष आहे.

तसेच येथे वाहतुकीसाठी दुसऱ्या बोगद्याची निर्मिती करण्याची मागणी करण्यात आली आहे.सर्व मागण्यांचे निराकरण १५ दिवसात न केल्यास रास्तारोको आंदोलन करण्याचा इशारा यावेळी तहसीलदारांना निवेदनातून देण्यात आला. यावेळी सरपंच संदीप बुरेवार, नीलेश येल्टीवार, हितेश राऊत, राहुल दांडेकर संतोष,हरिदास गुर्जलवार,रमेश रोडावार,शंकर आकुलवार,इत्यादींनी दिला आहे .

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर