ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

बेरोजगारी वाढली,उपाययोजना शून्य लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष

107 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

एम.आय.डी.सी.दाखवतेय वाकुल्या

आदिवासी बहुल तालुका असून रोजगारासाठी कुठलेही उपाय योजना नाही

सुरेश पाचभाई मारेगाव,

मारेगाव तालुक्यात 57 ग्रामपंचायत असुन 105 गावांचा समावेश आहे.तालुक्याची ओळख ही आदिवासी बहुल तालुका म्हणुन आहे. त्या दृष्टीने आज पर्यंत तालुक्यातील युवक व युवतीसाठी रोजगाराची तीळमात्र उपाययोजना लोकप्रतिनिधि किंवा प्रशासनाकडून कऱण्यात आली नाही ही शोकांकिता आहे.येथे असलेली एम.आय.डी.सी.ही बेरोजगार युवकांना वाकुल्या दाखवल्यासारखी भासत आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून लोकप्रतिनिधी निव्वळ निवडणुकीच्या
वेळी तालुक्यासाठी हे करू, ते करू असे पोकळ आश्वासने देऊन आपला पाणगा शिजवून निघून गेल्याचा इतिहास आहे.पण आजपर्यंत कुठल्याच लोकप्रतिनिधींनी तालुक्यासाठी व तालुक्यातील युवक युवतींसाठी रोजगारा संदर्भात कंपनी किंवा उद्योगाची साधने तालुक्यात उपलब्ध करणे गरजेचे समजले नाही.

तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग आहे आणि गेल्या दोन वर्षापासून अतिवृष्टी पूर बुडाई याने शेतकरी मेटीकुटीस आला आहे.आणि सुशिक्षित बेरोजगार मुले प्रत्येक गावात रोजगारासाठी भटकंती करताना दिसत आहे. पण त्यांना रोजगार तालुक्यात उपलब्ध नसल्याने दिवसेंदिवस बेरोजगारांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे.मात्र या कडे कोणत्याही नेते किंवा पुढाऱ्याचे लक्ष वेधले नाही ही शोकांकीता आहे.त्या मुळे तालुक्यांतील युवक वर्ग लोकप्रतिनिधी व प्रशासना संदर्भात तीव्र नाराजी व्यक्त करताना दिसत आहे.

======================== मारेगाव तालुक्यामध्ये मागील अनेक वर्षांपूर्वी एम.आय.डी.सी.झालेली आहे.परंतु एम.आय. डी.सी.झाल्यानंतर येथील युवकांना व्यवसायासाठी एक हक्काचे व्यासपीठ मिळेल.तसेच बेरोजगार युवकांना वाकूल्या दाखवणारा  मारेगाव शहरा पासुन अंदाजे एक किमी अंतरावर घोन्सा रोडवर एम.आय.डी.सीचा फलक गेल्या अंदाजे 30 वर्षा पासून लागला आहे.

मात्र लोकप्रतिनिधींच्या अकार्यक्षम कार्यप्रणालीमुळे अजून पर्यंत तिथे औद्योगिक प्रक्रिया सुरु करण्यात आलेली नाही.त्यामुळे एम.आय.डी.सी.चे नेमके काय झाले? व एमआयडीसी अंतर्गत औद्योगीक समस्या निकाली काढण्यासंबंधाचे कुठे घोडे अडले?हा प्रश्न आजही अधांतरीच आहे.

याचबरोबर मारेगाव तालुक्यात अनेक उद्योग आणून बेरोजगारांना रोजगार देण्याबाबत कुणीही बोलायला तयार नाहीत.खासदार व आमदार सारख्या जबाबदार लोकप्रतिनिधीनीही बेरोजगारांच्या समस्यांबाबत संवेदनशील दिसून येत नाही.मग या एमआयडीसी फलकाचे दर्शन दररोज कशासाठी?हा मुद्दा महत्वपूर्ण आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर