ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

माथार्जुन  आ. वि. का  . संस्थेवर  काँग्रेस – शिवसेनेचे वर्चस्व

63 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

शेतकरी विकास पॅनलचे १३ पैकी १३  सदस्य  विजयी

तालुका प्रतिनीधी :-झरी (जामणी) ज्ञानेश्वर आवारी
   [88059 79173]

झरी जामणी:-तालुक्यातील माथार्जुन येथील आदिवासी विविध कार्यकारी संस्थेची निवडणूक नुकतीच पार पडली असून त्या निवडणुकीमध्ये सत्ताधारी  माजी सभापती त्यांच्यासह दिग्गज नेत्यांचा या निवडणुकीमध्ये दारुन पराभव झाला आहे या निवडणुकीत सर्व दिग्गज नेत्यांनी प्रतिष्ठा पणाला लावून एकत्र येऊन चुरस निर्माण केली पण सामान्य कार्यकर्त्यांनी त्यांचा पत्ता साफ केला  “शेतकरी विकास पॅनल ” ला  निवडणुकीमध्ये एकूण 13 उमेदवार उभे केले होते.

या निवडणुकीमध्ये 13 पैकी 13 ही उमेदवार निवडून आलेले आहे आदिवासी विविध कार्यकारी संस्थेमध्ये तेरा पैकी तेरा ही उमेदवार विजयी झाल्याने सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे या निवडणुकीत विजयी उमेदवार संतोष जंगीलवार ,पुंडलिक मसराम ,माधव कोहचाडे , दादाराव मेश्राम ,रामकिसन लांडे ,गणपत ठाकरे ,पोतु कुमरे , मेशा आत्राम , गुणवंत आकुलवार , संजय सोयाम ,चंद्रकांत उईके ,गिरजाबाई टेकाम व  कार्निबाई  कुळसंगे यांचा समावेश आहे .


झरी युवक काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते रमेश किलचटवार संजय कुरमशेट्टीवार शंकर आकुलवार आणि शिवसेनेचे कार्यकर्ते बंडू देवाळकर शंकर लिंगलवार जिंदल मडावी ,संभाजी राऊत लक्ष्मण सुरपाम ,भास्कर भोयर शामराव मुरके मंगेश ठाकरे गजानन टेकाम भोनूभाऊ मेश्राम पुजाराम मेश्राम , गोसी किनाके ,विकास मुरके रवींद्र कोटेवार व इतर सह शेतकरी विकास पॅनलच्या विजयाचे

मार्गदर्शक माजी आमदार  वामनराव कासावार तसेच जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष  राजीव यल्टीवार, प्रकाश कासावार डॉ. चवरडोल   , प्रकाश म्याकलवार ,संदीप बुर्रेवार ,   निलेश येल्टीवार, मिथुन सोयाम , निलेश तुमराम , मिथुन राजूरकर यांनी परिश्रम घेतले

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर