ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

मुकुटबन येथील आर सी सी पी कंपनी मध्ये आढळला मानवी  सांगाडा

77 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

बांधकामाच्या रेतीत कापडात  कुजल्या अवस्थेत आढळलेला सांगाडा कुणाचा ?
मुकुटबन पोलीसांची पाच तास चौकशी 

तालुका प्रतिनीधी :-झरी (जामणी) ज्ञानेश्वर आवारी
   [88059 79173]

झरी जामणी :- मुकूटबन येथे उभारण्यात येत असलेल्या  रिलायन्स सिमेंट कंपनी  व एम.पी बिर्ला ग्रुप  चे  बांधकाम  मागील दोन ते अडीच वर्षापासून  होत आहे . येथील बांधकामासाठी गडचिरोली ,चंद्रपूर जिल्ह्यातील उत्तम प्रतीचे टिप्पर द्वारे रेती बोलविण्यात आले. गेल्या दोन वर्षात शेकडो ट्रीप रेती कामी लावण्यात येत आहे. मात्र त्याच रेतीत एका अनोळखी व अंगावर कपडे नसलेल्या कुजलेल्या अवस्थेत  एका कपड्यात गुंडाळलेल्या स्थितीत सांगाडा रेतीत आढळला. 

चौकशीसाठी पोलीस स्टेशनला रिपोर्ट देण्यात आले . येथील पोलिसांनी तब्बल पाच तास त्या कुजलेल्या सांगाड्याची  चौकशी करून  डी एन ए टेस्ट करण्यासाठी अमरावती येथे पाठवण्यात आल्याचे पोलिसांकडून माहिती मिळाली.  कपड्यात गुंडाळून सापडलेला, कुजलेल्या सांगाडा कुणाचा? घटना कुठे घडली . घातपात कुठे झाला, कंपनीत की बाहेर, असे अनेक प्रश्न उपस्थित होत असून  पत्रकारांना त्या ठिकाणावर जाऊ न देणे. यासर्व गोष्टी संशयास्पद वाटत आहे . या संदर्भात  ठाणेदार अजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरपाम, बोरकर, ताडकोपुलवार, संजय खांडेकर, घोडाम अधिक चौकशी करीत आहे

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर