ब्रेकिंग न्यूज
Manoj Jarange Pati आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात Ajay Barskar यांची ED कडे तक्रार घोडदरा येथील दादाजी गोविंदा दुमोरे यांचे निधन मातीशी नातं, सर्जा-राजाशी ऋणानुबंध! कपाशीवर फवारणीचा जोर; विषबाधेचा धोका वाढला! घराला CCTV लावले अन्… जामिनावर सुटलेल्या ‘मुजीब डॉन’चं भयंकर कांड, शेवटी पोलिसांनी उचललंच, छ. संभाजीनगरात… Hingoli Crop Loss News | सोयाबीन वाळलं! चक्क सात एकर सोयाबीनवर रोटावेटर फिरवला मारेगाव बसस्थानकावर खिशावर डल्ला; चौघे पोलिसांच्या ताब्यात ‘पिकांचा खर्चही निघेना’, पोळा कसा साजरा करायचा? शेतकऱ्याच्या डोळ्यात आलं पाणी, Video Crime : सूनबाईच मास्टरमाईंड! एकाच घरात राहून करोडपती सासऱ्याच्या हत्येचा कट, प्लान A,B फेल ठरला तर C मध्ये… मुंबईकर खोळंबा होणार! रात्री अनेक लोकल रद्द, मेल-एक्स्प्रेसलाही फटका, CSMT-कसारा शेवटची लोकल कधी?
SP News Maregaon

झरीचे गटविकास अधिकारी  मुंडकर यांची बदली

88 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

तालुका प्रतिनीधी :-झरी (जामणी) ज्ञानेश्वर आवारी
   [88059 79173]

झरी जामणी:- पंचायत समिती झरी जामणी येथे कार्यरत असलेले गटविकास अधिकारी गजानन मुंडकर यांची  बदली सहाय्यक गट विकास अधिकारी म्हणून प.स. कोरपणा जि. चंद्रपूर येते करण्यात आली आहे.प्रभारी गट विकास अधिकारी सुधाकर जाधव यांच्या नंतर गेल्या वर्षी मार्च महिन्यात त्यांनी झरी पं.स. झरी चा कार्यभार  स्वीकारला होता. त्यांची झरी येथे सेवेची प्रथम नियुक्ती असून कोरोनाची दुसरी लाटेच्या वेळी एक जबाबदार अधिकारी  म्हणून चांगली कामगिरी बजावली,

  अधिकारी व कर्मचारी यांची अनेक पद रिक्त असतांना दुर्गम आदिवासी झरी तालुक्यातील जनतेच्या समस्या समजून घेवून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न मुंडकर यांनी केला . शिक्षण क्षेत्रात वेगवेगळे उपक्रम त्यांनी राबवले असून वेळोवेळी ते जि.प. शाळाना भेटी देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधत असत . एक वर्ष चांगल्या प्रकारे कर्तव्य बजावले आहे .  यांच्या नंतर   कोणाची  वर्णी लागणार याकडे तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे .

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर