ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

अखेर चिंचमंडळ येथील पुरात वाहून गेलेल्या शेतकऱ्याचा आढळला मृतदेह

151 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

दापोरा जवळील उपाशा पुला जवळील सकाळी 11  वाजताची घटना

तहसीलदारव पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल

सुरेश पाचभाई मारेगाव,

मारेगाव तालुक्यातील दापोरा फाट्या जवळ असलेल्या उपाश्या पुलाच्या बाजूने पशुधन शेतात घेउन जाणारा शेतकरी पाण्याच्या वाहून गेल्याची घटना आज दिनांक 29 जुलै 2024 रोज सोमवारला सकाळी 11 वाजताचे सुमारास घडली होती.अखेर त्यांचा मृतदेह दुपारी 2 वाजताच्या सुमारास आढळला.

मेघश्याम नारायण वासाड वय अंदाजे 58 वर्ष रा.चिंचमंडळ असे मृतदेह आढळलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.तालुक्यात गेल्या दहा दिवसापासून सतत पाऊस सुरू असून तालुक्यातील नदी,नाले तुडुंब भरून वाहत आहे.अशातच चिंचमंडळ येथील शेतकरी मेघश्याम  हे आपले पशुधन घेवून शेतात जात असताना सकाळी 11 वाजताच्या सुमारास ते पुरात वाहून गेले होते.

सदर घटनेची माहिती तहसीलदार उत्तम निलावाड व पोलीस प्रशासनाला मिळतात ते लगेच घटनास्थळी दाखल झाले.त्यांचा शोधा शोध घेतला असता अखेर मृतदेह आज दुपारी 2 वाजताच्या सुमारास सापडला त्यामुळे चिंचमंडळ गावामध्ये शोकाकळा पसरली आहे.पोलिसांनी सदर घटनेचा घटनास्थळ पंचनामा करून त्यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा, दोन विवाहित मुली,नातवंड असा आप्त परिवार आहे.या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार शंकर पांचाळ यांच्या मार्गदर्शनात राजु टेकाम,रजनीकांत पाटील करीत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर