ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

बोटोणी शिवारात पट्टेदार वाघाचा मृत्यू

188 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

सुरेश पाचभाई मारेगाव,

मारेगाव तालुक्यातील बोटोणी येथील जंगल परिसरामध्ये असलेले मारोती मंदीर (जुन्या रिठ) जवळील नाल्यात वाघाचा मृतदेह आढळल्याची घटना आज दिनांक 29 जुलै 2024 रोज सोमवारला सकाळच्या सुमारास उघडकीस आली.बोटोनी चिंचोनी परिसरामध्ये मोठे जंगल आहे.तेथे वाहत असलेल्या नाल्यामध्ये वाघ मृत अवस्थेत आढळून आला.वाघाच्या मृत्यूने परिसरात खळबळ माजली आहे.

बोटोनी परिसरामध्ये मोठा जंगल परिसर आहे.तेथे मोठया प्रमाणात वन्य प्राण्यांचा वावर आहे.तेथे असलेल्या एका नाल्यामध्ये अंदाजे 4 वर्ष वयाचा वाघ मृतावस्थेत आढळून आला.वाघाच्या मानेवर जखम दिसून आली.त्यामुळे वाघ हा जंगलातून जातांना किंवा कोठे जातांना त्याच्या मानेला काहीतरी लागले असावे असा कयास व्यक्त केला जात आहे.

जंगलामध्ये वाघ हा फिरत असतांना त्याच्या मानेला शेताला कुंपण करतात तो तार किंवा इतर तीक्ष्ण वस्तू लागली असावी त्यामुळे त्याच्या मानेला जखम झाली.या जखमेच्या अति रक्त स्त्रावाने वाघाचा मृत्यू झाला असावा असा कयास वनपरीक्षेत्र अधिकारी शंकर हटकर यांनी व्यक्त केला आहे.या वाघावर बोटोनी येथेच पंचनामा करण्यात येणार आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर