ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

जि.प.उच्च प्राथमिक शाळा जामनी येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपंन्न

154 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)


मुच्छी येथील अविनाश परशुराम मडावी यांना अतुलनिय यशाबद्दल सत्कार करून जयंती उत्सव समिती झरी चे वतीने प्रदान करण्यात आली शिष्यवृत्ती

ज्ञानेश्वर आवारी झरी जामणी,

जामनी येथील जिल्हा परिषदे च्या शाळेत इयत्ता दहावी व बारावी  परीक्षेत यश संपादन केलेल्या माझी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजीत करण्यात आला.या प्रसंगी जामणी,झरी व दुर्गापूर येथील विद्यार्थी सदर सोहळ्यास उपस्थित होते.

शाळेतून एकलव्य रेसिडेन्सी स्कुल करिता पात्र झालेल्या देवयानी प्रमोद मेश्राम व वैभवी वामन सोयाम व समाज कल्याण वस्तीग्रुह करिता प्रवेशपात्र झालेली राणी राहुल ठाकरे या  विद्यार्थिनीचा शालश्रीफळ देऊन गौरव करण्यात आला. शालेय विद्यार्थ्यांच्या मनात उच्चशिक्षणाकरिता घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांची भीती नाहीशी करून त्यांच्या मनात नवी प्रेरणा निर्माण करण्याच्या हेतूने, अविनाश परशराम मडावी याच्या गुवाहाटी आय.आय.टी.व दिल्ली येथील सुप्रसिद्ध शिवनादर विद्यापीठ या ठिकाणी प्रवेशाच्या यशाबद्द्ल व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनीलजी काटकर, यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक प्राध्यापक टीकारामजी कोंगरे , राजीव कला महाविद्यालयाचे प्रा. डॉ. विठ्ठल पाईलवार,

ॲड. दिपक काटकर, प्रा .डॉ. मिलींद खरात,विस्तार अधिकारी एन.डि. किनाके, माजी सैनिक व ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी सन्माननीय सुनिल पाटील,सामाजिक कार्यकर्ते बंडू पारखी,समितीचे उपाध्यक्ष संदीप लेनगुळे,मुख्याध्यापक विनोद मडावी,सामाजिक कार्यकर्ते   पांडुरंग पोयाम, तुकाराम आत्राम मारोती कुसराम,नन्नुभाऊ कोडापे,सुनिल गुरनुले,विनोद डोहे,केशव कोडापे, अमोल मंचलवार, प्रवीण मंचलवार, राहुल ठाकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

जयंती उत्सव समिती झरी व प्राध्यापक टिकारामजी  कोंगरे यांचे वतीने अविनाश मडावी याला शिष्यवृत्ती व भारतीय संविधानाची प्रत प्रदान करण्यात आली.जिल्हा परिषद कनिष्ठ प्राथमिक शाळा कोडपाखिंडी च्या मुख्याध्यापिका विभाताई मडावी व तेथील विद्यार्थी यांनी याप्रसंगी “एक होता कार्व्हर” हे प्रेरणादायी पुस्तक अविनाश मडावी यांना भेट स्वरूपात दिले.

कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता सुवर्णा अक्कलवार, रेखाताई जिड्डेवार,विठ्ठल ऊईके,प्रशांत सोयाम,अविनाश कुडमेथे नागेश सोयाम,विलास मंचलवार व जामणी गावातील समस्त नागरिक व माजी विद्यार्थी यांनी मोलाचे सहकार्य केले.कार्यक्रमाची उत्कृष्ट सूत्रसंचालन इयत्ता सातवीतील विद्यार्थिनी कुमारी श्रेया चाटारे व कान्हा मंचलवार यांनी केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक विनोद मडावी यांनी केले तर प्रा.टिकारामजी कोंगरे,ऍडव्होकेट दीपक काटकर,नामदेव किनाके साहेब, प्रा.डॉ.विठ्ठल पाईलवार,मुख्याध्यापक विनोद मडावी,रुद्राजी कुचनकार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.सत्कारमूर्ती अविनाश मडावी यांनी आपल्या भाषणातून परिस्थिती वरती मात करण्यास शिका,मनात संकोच न ठेवता व कुठली भीती न बाळगता नियमित नव्या ज्ञानाच्या शोधात राहा.अपयशाने खचून जाऊ नका.डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व डॉक्टर ए.पी.जे.अब्दुल कलाम यांनी दाखविलेल्या मार्गाने सतत प्रयत्नरत रहा.देशातील नामांकित विद्यापीठात शिक्षण घेण्याचा प्रयत्न करा.असा संदेश विद्यार्थ्यांना दिला.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर