ब्रेकिंग न्यूज
उभ्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक; तरुण गंभीर जखमी मारेगावच्या वारंवार वीजखंडितीविरोधात नागरिक आक्रमक; सात दिवसांचा अल्टिमेटम Konkan Railway: कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी गुड न्यूज, विशेष रेल्वेला अतिरिक्त थांबे, पण कुठे? पतीच्या व्हॉट्सॲपवरून नंबर घेतला, त्याला अडचण सांगितली, 26 वर्षांच्या विवाहितेला ‘ती’ चूक भोवली, छ. संभाजी… FDA News | अन्नाच्या नावाखाली काळा धंदा! FDA कडून पर्दाफाश | Tukaram Mundhe News | Special Report Satish Maratha Murder : ‘प्रत्येक चौकात मीच टिकणार…’, सतीश मराठावर 39 सपासप वार करण्याआधी राहुलचा शेवटचा … Lumpy Skin Disease : जनावराला ताप अन् शरीरावर सूज, असू शकतो लम्पी आजाराचा धोका, अशी घ्या काळजी Video पुणेकर वाहतूक कोंडीचं टेन्शन सोडा! पाषाण ते कोथरूड अवघ्या 10 मिनिटांत, नेमका प्लॅन काय? ‘ओम नम: शिवाय’चा जप करत पोरानं मैदानात घातला तांडव! मॅच जिंकून दिली, कोण आहे वंश बेदी? पाहा Video Raj Thackeray News | तिसरी मुंबई कुणासाठी? राज ठाकरेंचा सवाल! | Special Report
SP News Maregaon

भरधाव दुचाकीची उभ्या ट्रकला धडक, दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू.

145 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

मार्डी ते खैरगाव रस्त्यावरील घटना.

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184

मारेगाव तालुक्यातील मार्डी- खैरगाव रस्त्यावर भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकीची उभ्या ट्रकला जबर धडक दिल्याने दुचाकीस्वार चालक हा जागीच ठार झाल्याची घटना दिनांक 3 सप्टेंबर 2022 रोज शनिवारला रात्री 10 वाजताच्या सुमारास ही घटना घडली.

संजय पांडुरंग धारणे वय सुमारे 48 वर्षे असे अपघातात जागीच ठार झालेल्या इसमाचे नाव असुन ते चिंचमंडळ कडून मोटर सायकल क्रमांक MH.40 D.6382 ह्या दुचाकीने किन्हाळा (मार्डी) येथे मूळ गावी येत असतांना मार्डी-खैरगाव रस्त्यालगत उभ्या असलेल्या ट्रक ला जबर धडक दिली.

यात त्यांच्या डोक्याला गंभीर इजा पोहचल्याने संजय यांचा जागीच मृत्यू झाला असुन मृतकाच्या पश्चात आई,पत्नी,एक मुलगा,दोन मुली असा आप्तपरीवार आहे. या घटनेची माहिती मारेगाव पोलीसांना मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले.

पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय मारेगाव येथे पाठविण्यात आला असुन पुढील तपास मारेगाव येथील ठाणेदार राजेश पुरी यांच्या मार्गदर्शनात पोलीस जमादार सुरेंद्र टोंगे व विनेश राठोड करीत आहेत.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर