ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

टाटा मॅजिक मालवाहतुक गाडीची दुचाकीला धडक एक ठार एक गंभीर जखमी.

98 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

राज्य महामार्गावरील गौराळा फाट्यापासुन काही अंतरावर भिषण अपघात.

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]

सविस्तर वृत्त असे की.
मारेगाव तालुक्यातील यवतमाळ वणी राज्य महामार्गावर गौराळा फाट्यापासुन काही अंतरावर दिनांक 3 ऑगस्ट 2022 रोज बुधवारला दुपारी 11:30 वाजताच्या सुमारास वणी वरून भरधाव वेगाने येत असलेल्या टाटा मॅजिक क्रमांक MH.29 T 6354 या वाहनाने विरुद्ध दिशेने जाणाऱ्या दुचाकीस्वारांना जबर धडक दिल्याने एक जण जागीच ठार तर दुसऱ्या गंभीर जखमी झाला आहे.

गौराळा फाट्यापासून काही अंतरावर हा अपघात झाला.असुन बाळकृष्ण महादेव पाचभाई वय सुमारे [60] वर्ष रा.कवठाळा पो.नांदगाव ता.कोरपना जी.चंद्रपूर असे अपघातात ठार झालेल्या इसमाचे नाव असून दुसऱ्या व्यक्तीचे नाव शिवदास राघोबा पायघन वय सुमारे [62] वर्ष रा.ईरई ता.कोरपणा जि.चंद्रपूर हे गंभीर जखमी झाले आहे.ते आज काई कामानिमित्त वाई कान्हाळगाव [पांढरकवडा] येथे गेले होते.तेथील काम आटपुण वणी कडे [MH.22AH.8606] या क्रमांकाच्या दुचाकीने जात असताना गौराळा फाट्यापासुन काही अंतरावर टाटा मॅजिक वाहनाने जबर धडक दिली.

यात दुचाकीस्वार चालक ठार तर मागे बसलेले गंभीर जखमी झाले असुन जखमींना वणी येथील दवाखान्यात प्रथम उपचार करून पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे पाठविण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे. या घटनेची माहिती मारेगाव पोलीसांना मिळताच पोलीस घटनस्थळी दाखल झाले व पुढील तपास मारेगाव पोलीस करत आहे..

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर