ब्रेकिंग न्यूज
Konkan Railway: कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी गुड न्यूज, विशेष रेल्वेला अतिरिक्त थांबे, पण कुठे? पतीच्या व्हॉट्सॲपवरून नंबर घेतला, त्याला अडचण सांगितली, 26 वर्षांच्या विवाहितेला ‘ती’ चूक भोवली, छ. संभाजी… FDA News | अन्नाच्या नावाखाली काळा धंदा! FDA कडून पर्दाफाश | Tukaram Mundhe News | Special Report Satish Maratha Murder : ‘प्रत्येक चौकात मीच टिकणार…’, सतीश मराठावर 39 सपासप वार करण्याआधी राहुलचा शेवटचा … Lumpy Skin Disease : जनावराला ताप अन् शरीरावर सूज, असू शकतो लम्पी आजाराचा धोका, अशी घ्या काळजी Video पुणेकर वाहतूक कोंडीचं टेन्शन सोडा! पाषाण ते कोथरूड अवघ्या 10 मिनिटांत, नेमका प्लॅन काय? ‘ओम नम: शिवाय’चा जप करत पोरानं मैदानात घातला तांडव! मॅच जिंकून दिली, कोण आहे वंश बेदी? पाहा Video Raj Thackeray News | तिसरी मुंबई कुणासाठी? राज ठाकरेंचा सवाल! | Special Report पत्नी अन् लेकरांना सोडून पोटाची खळगी भरण्यासाठी गाठलं महाराष्ट्र; पण कामावर जाताच संदीपसोबत भयंकर घडलं PM Kisan Samman Nidhi : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! ‘या’ एका चुकीमुळे थांबणार पीएम-किसानचे ६,००० रुपये!
SP News Maregaon

आरक्षण जाहीर होताच राजकीय हालचालीना वेग.

96 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

पुढार्‍यांच्या भेटी गाठी वाढल्या.

तालुका प्रतिनीधी :-झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी
[88059 79173]

झरी जामणी :- जिल्हा परिषद व पंचायत समिती च्या निवडणूक तारखा जाहीर करण्यात आल्या नसल्या तरी ग्रामीण भागात राजकीय हालचाली ना वेग आला आहे . नुकत्याच दिनांक २८ जुलै २०२२ ला जिल्हा परिषद व पंचायत समिती गण व गटाचे आरक्षण सोडत जाहीर करण्यात आले . या आरक्षण सोडते मुळे या निवडणुकीसाठी इच्छुक असणाऱ्यांनी आनंद व्यक्त केला तर काहींचा मात्र अपेक्षाभंग झाला आहे . निवडणुकीसाठी अनेक हौसे गवसे गुडघ्याला बाशिंग बांधून तयार झाले आहेत.

आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून जनतेशी भेटीगाठी वाढल्या आहेत.इच्छुकांचे कार्यकर्ते गोळा करून दिल्ली पासून तर गल्लीपर्यंतच्या समस्ये करिता निवेदन देऊन प्रसिद्धी चे श्रेय आपल्या पदरी पाडण्याचा प्रयत्न करातांना दिसत होते.परंतु या आरक्षण सोडतीने नेता बनण्याचे स्वप्न अपूर्ण राहणार आहे.२०१६ च्या निवडणूकी चार गट व दोन गण होती या निवडणुकीत १ गण व दोन गट वाढले आहेत . यामुळे निश्च जास्त कार्यकर्त्यांना नेतृत्वाची संधी उपलब्ध होणार आहे.माजी सभापती राजेश्वर गोड्रावार,तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य मिनाक्षी बोलेनवार यांचा गण आणि गट अनुसूचित आरक्षित झाल्याने त्यांना यावेळी संधी मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

पक्षाने आपल्याला संधी दिली असून पक्षाच्या आदेशाचे पालन करणार.पक्षाने दिलेल्या उमेदवाराच्या पाठीशी राहून जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केला आहे .झरी पंचायत समितीच्या निर्मितीपासून पंचायत समितीवर काँग्रेसचे वर्चस्व होते परंतु २०१६ ला भाजप सत्ता काबीज केली.पंचायत समिती मध्ये भाजप चे २ , काँग्रेस १ व शिवसेना १ सदस्य व जि.प. दोन्ही सदस्य भाजपचे राहीले.यावेळी कॉंग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कंबर कसली असून तरुण कार्यकर्त्यांची फळी निर्माण केली आहे.

माजी आमदार वामराव कासावार यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणू लढली जाणार आहे.माजी जि .प .सदस्य आशिष कुळसंगे,राजीव कासावार , निलेश येल्टीवार,संदिप बुर्रेवार,भूमारेड्डी बाजन्लावार,पानघाटे अमोल आवारी,माजी समाज कल्याण सभापती गिरिधर उइके,राहुल दांडेकर यांची नावे चर्चेत आहेत.मागील वेळी शिवसेनेकडे पं.स.एकच जागा होती तालुका प्रमुख चंद्रकांत घुगूल यांची सौ प्रणिती घुगल ह्या एकच सदस्य निवडून आल्या होत्या.सध्या शिवसेनेकडे बाजार समिती व झरी नगर पंचायत वर वर्चस्व आहे.संतोष माहुरे,चंद्रकांत घुगुल,शितल पंधरे,संदिप विंचू , निलेश बेलेकर इ. नावे चर्चेत आहेत.परंतु सामाजिक कार्यकर्त्या मंगेश पाचभाई मुकुटबन गणातून शिवसेने निवडणूक लढणार असून शिवसेनेच्या एका नेत्याने त्याला शब्द दिल्याचे सांगितले जात आहे. मु

कुटबन,अडेगांव परिसरात रस्ता, पाणी ,वीज दवाखाना या विषय अनेक आंदोलने केली आहे.त्यामुळे तरुण तडफदार नेतृत्व म्हणून त्यांनी ओळख निर्माण केली आहे.परंतु तालुक्यातील जुन्या नेत्यांना या गोष्टीला दुजोरा मिळाला नाही .
या व्यतिरिक्त जंगोमदल , भारतीय गोंडवाना गणतंत्र पक्ष , अपक्ष उमेदवार प्रस्थापितांचे गणित बिघडवू शकते.यामुळे ही निवडून प्रस्थापितासाठी सोपी नाही.अनेकांनी गरिब शेतकऱ्यांच्या फायदा च्या योजना लाभ काही पुढच्या लोकांनी लाटाला , विकास कामाचा मातेरा झाला आजही.अनेक गावात नीट रस्ते नाही.शाळा आहे.

पण शिक्षक नाही.दवाखाने बांधली ना डॉक्टर ना औषधी , दुग्ध व्यवसाय कागदावर आहे.टाकी आहे पण पाणी नाही.बहुतेक गाव आरोबंद शुद्ध पाणी नावालाच आहे.अनेक लाभाच्या योजना अजूनही गरिब ,निराधार,आदिवासी जनतेपर्यंत पोहोचलेल्या नाही.भ्रष्ट कारभारा विरोधात जनतेनी अनेक तक्रारी केल्या परंतु त्यांना कचरा पेटी दाखविली गेली . अशा प्रश्नांचा जाबब जनता नक्कीच मागणार आहे .

जिल्हा परिषद तीन गट –
मार्थाजून – अनुसुचित जमाती महिला ,   पाटण व  मुकुटबन – सर्वसाधारण

पंचायत समिती सहा गण –
सुर्ला – अनुसुचित जमाती माहीला
मार्थाजून अनुसुचि जमाती सर्व साधारण
मार्की – सर्वसाधारण
मुकुटबन –  सर्व साधारण महिला
मांगली – ना मा.प्र. सर्वसाधारण
पाटण – सर्व साधारण महिला

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर